आता चर्चा फक्त पीओकेची आहे!
कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा कठोर संदेश : भारत नवोन्मेषाचे मार्ग शोधतोय, पाकिस्तान घुसखोरीचे
वृत्तसंस्था
लेह
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांदरम्यान पोहोचलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कठोर संदेश आता पाकव्याप्त काश्मीर (पीओके) व्यतिरिक्त अन्य कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने भारताच्या भूमीवर अवैध कब्जा करून ठेवला आहे आणि त्याला हा भूभाग सोडावा लागेल. दहशतवादात सामील लोकांची अवस्था काय होणार हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला त्याने कल्पनाही केली नसेल अशाप्रकारचे प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी रविवारी काढले आहेत.
भावी पिढ्या कारगिलच्या नायकांच्या शौर्याच्या कहाण्यांमधून प्रेरणा मिळवतील. 27 व्या कारगिल विजय दिनी आमच्या शूर सैनिकांना आणि त्यांच्या साहसाला सलाम. कारगिल विजय भारत मातेच्या मुकूटात जडलेल्या हिऱ्यासमान असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
भारतात डाटा सेंटर, पाकिस्तानात कट्टरवादी सेंटर
आता पाकिस्तानशी कुठलीच चर्चा होणार नसल्याची आमची भूमिका स्पष्ट आहे. जर कुठल्याही प्रकारची चर्चा होणार असेल तर ती केवळ पीओकेवरच होईल, पीओके हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यावर पाकिस्तानने अवैध कब्जा करून ठेवला आहे. भारत अत्याधुनिक विमानांचे डिजाइन करण्यात गुंतलेला असताना पाकिस्तान दहशतवादाची रुपरेषा तयार करण्यात व्यग्र आहे. आम्ही आधुनिक आणि नवनवे मार्ग शोधत आहोत, तर पाकिस्तान घुसखोरीच्या नव्या पद्धती शोधण्यात बुडालेला आहे. भारत आज डाटा सेंटर उभारत असताना पाकिस्तान कट्टरवादाची केंद्रे निर्माण करतोय. भारत सेमीकंडक्टर निर्माण करतोय, तर पाकिस्तान सुसाइड बॉम्बर्स तयार करत आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
कारगिल विजय दिवस
कारगिल विजय दिन हा भारताच्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी साजरा करण्यात येतो. पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर कारगिलच्या रणनीतिक शिखरांवर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी ऑपरेशन विजय नावाने सैन्य अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान 1999 साली यशस्वीपर्ण पूर्ण झाले होते. कारगिलमध्ये मिळालेला विजय केवळ सैन्य किंवा कूटनीतिक यश नव्हते, तर आमच्या सैनिकांनी अदम्य साहस अन् अद्वितीय शौर्याचे उदाहरण दाखवून दिले होते. 27 व्या कारगिल विजय दिनी आमच्या वीर सैनिक आणि त्यांच्या शौर्याला नमन करतो असे उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले आहेत.
कारगिल युद्धस्मारकावर पुष्पवर्षाव
राजनाथ सिंह यांच्यापूर्वी लडाखचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना, सैन्यप्रमुख जनरल धीरज सेठ, उत्तर कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा तसेच सैन्याच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारगिल युद्धस्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पित केले. यादरम्यान तीन हेलिकॉप्टर्सनी ‘एरोहेड’च्या संरचनेत उ•ाण करत युद्धस्मारकावर पुष्पवर्षाव केला आहे.
Comments are closed.