FIFA World Cup 2026 – अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा 3-1 ने फडशा पाडला, उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडशी गाठ पडणार
गतविजेत्या अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा 3-1 असा फडशा पाडत फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक दिली आहे. उपांत्य फेरीमध्ये अर्जेंटिनाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडने नॉर्वेचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
कॅन्सस सिटी स्टेडियमवर रंगलेल्या लढतीत दोन्ही संघानी दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले. स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने घेतलेल्या शानदार कॉर्नरवर अलेक्सिस मॅक अलिस्टरने उत्कृष्ट हेडरद्वारे गोल करत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर स्वित्झर्लंड खेळाडूंनी अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. मात्र त्यांना गोल करता आला नाही. मध्यांतरापर्यंत अर्जेंटिनाकडे आघाडी कायम होती. मध्यांतरानंतर स्वित्झर्लंडच्या डॅन एनडोये याने 67 व्या मिनिटाला अप्रतिम गोल करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
खेळात खरा थरार निर्माण झाला तो 72 व्या मिनिटाला. स्वित्झर्लंडचा खेळाडू ब्रील एम्बोलो याला सिम्युलेशनसाठी दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे स्वित्झर्लंडला पुढील जवळपास 40 मिनिटे 10 खेळाडूंसह खेळावे लागले. पंचांनी सुरुवातीला अर्जेंटिनाच्या लिएंड्रो पेरेडेसला फॉऊलसाठी बुक केले होते. मात्र, व्हीएआरच्या तपासणीनंतर पंचांनी आपला निर्णय बदलला आणि पेरेडेसचे कार्ड मागे घेत एम्बोलोला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अर्थात 10 खेळाडूंसह स्वित्झर्लंडने जोरदार लढा दिला आणि सामना अतिरिक्त वेळेत खेचून नेला.
अर्जेंटिनाच्या अतिरिक्त वेळेतील गोलने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले! 💪#FIFAWorldCup
— फिफा विश्वचषक (@FIFAWorldCup) 12 जुलै 2026
Comments are closed.