FIFA World Cup 2026 – साकाची हॅटट्रिक, एम्बाप्पेचा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंड विरुद्ध फ्रान्स लढतीत पडला 10 गोलचा पाऊस
फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी रात्री उशीरा गतविजेता अर्जेंटिना आणि 2010 मधील विजेता स्पेनमध्ये रंगणार आहे. तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि फ्रान्समध्ये हार्ड रॉक स्टेडियमवर थरारक सामना रंगला. पहिल्या मिनिटापासून चुरशीच्या झालेल्या या सामन्यात तब्बल 10 गोलचा पाऊस पडला. इंग्लंडने हा सामना 6-4 अशा गोल फरकाने जिंकला. इंग्लंडच्या बुकायो साका याने गोलची हॅटट्रिक केली, तर फ्रान्सच्या एम्बाप्पेने दोन गोल करत फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 22 गोल करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
इंग्लंड आहेत #FIFAWorldCup कांस्य अंतिम विजेते 🏴
— फिफा विश्वचषक (@FIFAWorldCup) 18 जुलै 2026
Comments are closed.