FIFA World Cup 2026 – नॉर्वेची नौका बुडाली! संकटमोचक बेलिंगहॅमच्या दुहेरी गोलमुळे इंग्लंडला सेमीफायनलचे तिकीट
अतिरिक्त वेळेत ज्युड बेलिंगहॅमने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने नॉर्वेचा 2-1 असा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. नॉर्वेचे खडतर आव्हान मोडून काढत इंग्लंडचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीत कायम राहिला आहे. इंग्लंडसाठी बेलिंगहॅम पुन्हा एकदा संकटमोचक ठरला असून त्याने सामन्यात दोन महत्त्वाचे गोल केले.
मियामीमध्ये प्रचंड उष्णतेत खेळलेल्या गेलेल्या या लढतीत नॉर्वेने इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का दिला. अँड्रियास श्जेलडरप याने गोल करत नॉर्वेला आघाडी मिळवून दिली. मात्र, गेल्या सामन्यात मेक्सिकोविरुद्ध दोन गोल करणाऱ्या बेलिंगहॅमने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. मध्यांतराला काही मिनिटं बाकी असताना अँथनी गॉर्डनच्या पासवर बेलिंगहॅमने अत्यंत चपळाईने बॉक्समध्ये प्रवेश केला आणि गोल करत इंग्लंडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
थ्री लायन्सने उपांत्य फेरीत आपले स्थान पटकावले 🏴 #FIFAWorldCup
— फिफा विश्वचषक (@FIFAWorldCup) 11 जुलै 2026
Comments are closed.