इंडोनेशियातील कँडी कारखान्याला आग, 7 मृतदेह बाहेर, 50 अद्याप बेपत्ता
इंडोनेशियातील एका कँडी कारखान्यात भीषण अपघात झाला. कारखान्याला लागलेल्या आगीत 7 कामगारांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कारखान्यात असलेले 50 कामगार अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री कारखान्यात आग लागल्याची माहिती आहे. आग इतकी भीषण होती की रविवारपर्यंत ती विझवता आली नाही.
इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील सेरोंग रीजेंसी येथील चिकंदे भागात शनिवारी रात्री हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि बचाव पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून आतापर्यंत 7 मृतदेह सापडले आहेत. मात्र, मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे जवळजवळ अशक्य होते. अपघात झाला त्यावेळी तेथे अनेक मजूर काम करत होते. किमान 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मृतदेह ओळखण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने गोळा करण्यात येत आहेत. फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. काही भागात अजूनही धूर दिसत आहे. मृतदेह ओळखण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांकडून डीएनए नमुने गोळा करण्यात येत आहेत. फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. परिणामी, मृतदेह ओळखण्यासाठी 2 ते 3 आठवडे लागू शकतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की, बहुतांश मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. या प्रकरणात डीएनए सॅम्पलिंगद्वारेच ओळख शक्य आहे.
अपघातानंतर कारखान्याच्या मालकाने सांगितले की, शनिवारी दिवसाच्या शिफ्टमध्ये सुमारे 300 कामगार काम करत होते. त्यापैकी 50 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. पीडितांच्या कुटुंबीयांना संस्था पूर्ण सहकार्य करेल आणि शक्य ती सर्व मदत करेल, असेही ते म्हणाले. आग लागल्यानंतर लगेचच आतील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आग झपाट्याने पसरली, असेही त्यांनी सांगितले. सध्या शोधमोहीम सुरू आहे.
Comments are closed.