गाझियाबादमधील एका अपार्टमेंटमध्ये आग
गोल्ड ग्रीन सोसायटीमधील दुर्घटनेत जीवितहानी टळली
वृत्तसंस्था/गाझियाबाद
दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या इंदिरापुरम भागातील बहुमजली ‘गोल्ड ग्रीन सोसायटी’मधील एका फ्लॅटला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण सध्या अज्ञात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र, आगीची तीव्रता इतकी होती की, दूरवरूनही धुराचे लोट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. संपूर्ण अपार्टमेंट तातडीने रिकामे करण्यात आले होते. गाझियाबाद पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली होती.
Comments are closed.