नोएडातील इमारतीला आग; एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू
नोएडा:
उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील मामूरा गावात एका इमारतीला भीषण आग लागली, ज्यानंतर तेथे राहणाऱ्या 100 हून अधिक परिवारांचा जीव धोक्यात सापडला होता. ही आग इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्पार्किंगमुळे सुरू झली होती, ज्याने आसपास उभ्या अन्य वाहनांनाही जाळून खाक केले आहे. अग्निशमन दलाच्या 7 वाहनांनी तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. आगीच्या या घटनेत एका महिलेसमवेत दोन जणांचा मृत्यू झाला.
या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून अधिकाऱ्यांना तत्परतेसह मदत अन् बचावकार्य राबविण्याचा आदेश दिला आहे. आगीमुळे निघालेल्या विषारी धूराने पूर्ण इमारतीला घेरले होते, यामुळे दोन जणांची प्रकृती बिघडली आणि यातच त्यांचा मृत्यू ओढवला. ही आग कथित स्वरुपात चार्जिंगदरम्यान स्कूटरच्या बॅटरीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि वेगाने पूर्ण इमारतीत फैलावली. या इमारतीचा वापर पीजी म्हणून करण्यात येत होता. ही चारमजली इमारत असूत यात जवळपास 50 परिवार राहत होते.
Comments are closed.