एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात विंडीजचा नवा अध्याय! भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची 'ऐतिहासिक शतकी हॅट्ट्रीक', पहिल्यांदाच 3 फलंदाजांनी…

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज (बुधवार, ३० सप्टेंबर) गुवाहाटी येथे खेळला जात आहे. यामध्ये वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. त्यांच्या एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन फलंदाजांनी धमाकेदार शतके झळकावली आहेत. याबरोबर विंडीजच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला.

बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकला आणि कर्णधार शुभमन गिलने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामध्ये अनेक बदल झाले, मात्र त्याचा यजमानांना फायदा झालेला दिसला नाही. कारण, वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकली आहे. त्यातील दोघांनी तर भारताविरुद्ध जलद एकदिवसीय शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे.

वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय इतिहासात आजवर एका डावात कधीही तीन शतके झाली नव्हती, मात्र भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ते घडले आहे. सर्वप्रथम तर जॉन कॅम्पबेलने ६५ चेंडूत शतक केले, जे चेंडूंच्या संख्येनुसार एकदिवसीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिजकडून पाचवे जलद आणि भारताविरुद्ध सर्वात जलद शतक ठरले. तो १०१ धावा करून बाद झाला. त्याला गुरनूर ब्रारने बाद केले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपनेही शतकी खेळी केली. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील २० वे शतक केले. तो १०२ धावा करत बाद झाला. त्यानंतर आमीर जंगू यानेही शतकी खेळी केली. हे त्याचे दुसरे एकदिवसीय शतक ठरले. त्याने ११४ (७७) धावा केल्या.

एका एकदिवसीय डावात तीन शतके
दक्षिण आफ्रिका (अमला/रोसोउ/ एबीडी) विरुद्ध वेस्ट इंडीज – जोहान्सबर्ग २०१५
दक्षिण आफ्रिका (डी कॉक/डुप्लेसिस/एबीडी) विरुद्ध भारत – वानखेडे २०१५
इंग्लंड (सॉल्ट/मालन/बटलर) विरुद्ध नेदरलँड्स – ॲमस्टेलवीन २०२२
दक्षिण आफ्रिका (डी कॉक/व्हॅन डर ड्यूसेन/मार्कराम) विरुद्ध श्रीलंका – दिल्ली २०२३
ऑस्ट्रेलिया (हेड/मार्श/ग्रीन) विरुद्ध दक्षिण आफ्रिका – मॅके २०२५
वेस्ट इंडिज (कॅम्पबेल/होप/जंगू) विरुद्ध भारत – गुवाहाटी 2026

Comments are closed.