अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाची कारवाई; तीन नौकांवर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी एक नौका आणि दोन स्क्विड जिगिंग नौका सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने पकडल्या आहेत. रात्रीच्या गस्ती दरम्यान दोन स्क्विड जिगिंग नौकांवर कारवाई करण्यात आली.त्यामध्ये सानिया हाफसा,नोंदणी क्र. आयएनडी -एम एच-०४-एमएम-३८५१ मालक-सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर आणि एच सीमक नोंदणी क्र. आयएनडी -एमएच-०४-एमएम-६०१ मालक- सुलताना अख्तर होडेकर यांच्या मासेमारी नौका पकडण्यात आल्या आहेत.

कर्ला जेट्टी येथे तपासणीदरम्यान गुरूप्रसाद नौका क्र. आयएनडी- ०४-एमएम-३७६६ ही सुगंधा सुरेश ताकले यांच्या मालकीची नौका एलईडी दिवे लावून मासेमारी करत असताना पकडण्यात आली आहे.

अवैध मासेमारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मत्स्य विभागामार्फत समुद्रातील तसेच जेट्टी व बंदर परिसरातील गस्त, तपासणी व कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायातील नियमांचे पालन करूनच मासेमारी करण्याचे आवाहन मत्स्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

Comments are closed.