सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार दिसून येत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 2,675 ने वाढून प्रतितोळ 1.25 लाखांवर पोहोचला. गुरुवारी तो 1.23 लाख रुपये प्रतितोळा होता. याचदरम्यान, शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 5,928 ने वाढून 1.53 लाखांवर पोहोचला. गुरुवारी तो 1.47 लाख होता. दोन दिवसांत सोन्याचा भाव 4,278 रुपयाने आणि चांदीचा भाव 10,330 रुपयांनी वाढला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 1.21 लाख रुपयांपर्यंत आणि चांदीचा भाव 1.43 लाख रुपयांपर्यंत घसरल्यामुळे गुंतवणूकदार कमी किमतींचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तू खरेदी करत आहेत. देशात आता लग्नसराई सुरू होणार असल्यामुळे दागिने आणि चांदीची मागणी वाढली आहे. तसेच अमेरिकन डॉलरची स्थिती आणि बदलत्या जागतिक बाजारपेठेतील संकेतांमुळे परदेशात किमती स्थिर झाल्या आहेत. याचाच परिणाम सध्या भारतात दिसून येत आहे.

Comments are closed.