'फ्लायदुबई' विमानाला हवेत पक्ष्याने धडक दिली

लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग : 163 प्रवासी सुरक्षित

वृत्तसंस्था/ लखनौ

फ्लाय दुबईच्या विमानाने शनिवारी सकाळी 7:13 वाजता लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग केले. चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उतरत असताना विमानाला पक्ष्याची धडक बसली. पायलटने विमानाला योग्यप्रकारे नियंत्रित करून विमानातील सर्व 163 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे उतरवले. विमानतळ सूत्रांनुसार, दुबईहून येणारे आणि सकाळी 6:35 वाजता लखनौमध्ये पोहोचणारे फ्लाइट एफडी-443 खराब हवामानामुळे सुमारे 38 मिनिटे उशिरा पोहोचले. विमानतळाजवळ येत असताना विमानाला पक्ष्याची धडक बसली. पायलटने तात्काळ लँडिंगसाठी धावपट्टी मोकळी करण्याची विनंती केली. विमानतळ प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद देत विमानासाठी धावपट्टी मोकळी केली. लँडिंगनंतर विमान धावपट्टीवरून हटवून पार्किंग बेमध्ये उभे करून त्याची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली. विमानतळ सूत्रांनुसार, जर सामान्य लँडिंग झाले असते, तर विमान सकाळी 8:15 च्या आधी दुबईसाठी रवाना झाले असते. तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून दुपारपर्यंत विमानाची तपासणी सुरू राहिल्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत ते साडेसहा तासाहून अधिक वेळ विमानतळावरच होते. सर्व सुरक्षा मानके 100 टक्के सकारात्मक असल्याची खात्री झाल्यावरच विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

Comments are closed.