Mumbai News – हॉटेल्सनंतर फूड स्टॉल्सना दणका; पश्चिम रेल्वे स्थानकावरील 22 स्टॉल बंद, FDA ची धडक कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एफीडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंडे गेल्या महिन्याभरापासून अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबईकरांना खराब अन्न खाऊ घालणाऱ्या हॉटेल्स, क्लब आणि स्टॉल्सवर धडाकेबाज कारवाई करत आहेत. खराब अन्नपदार्थ व अस्वच्छतेच्या कारणास्तव सहा नामांकित हॉटेल्स आणि क्लबचे अन्न परवाने निलंबित केले असून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठी कारवाई केली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचे अन्न विकल्याप्रकरणी प्रशासनाने पश्चिम रेल्वे स्थानकावरील तब्बल 22 फूड स्टॉल बंद केले आहेत.

कारवाईची मुख्य कारणे

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जुलै या कालावधीत रेल्वे नेटवर्कवर एकूण 1,523 नियमित तपासण्या करण्यात आल्या. याचे अहवाल आल्यानंतर एफडीएने पश्चिम रेल्वे स्थानकावरील एकूण 22 स्टॉलवर धडक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या वेंडरवर दंड ठोठावण्यात आला आहे. याची किंमत एकूण एकूण 1 लाख 14 हजार रुपये इतकी आहे.

कुठे झाली कारवाई?

पश्चिम रेल्वेचे प्रसिद्ध स्थानक वांद्रे टर्मिनसवर सर्वाधिक स्टॉलवर कारवाई करण्यात आली असून एकाच वेळी 11 स्टॉल बंद करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त ग्रॅंट रोड, लोअर परेल, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स रेल्वे स्थानकांनावरील स्टॉलवरही टाळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवरून खाद्यपदार्थ घेणाऱ्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत थोडी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईला वेग; मुंबईतील सहा हॉटेल्स, क्लबचे परवाने निलंबित

Comments are closed.