बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून; इचलकरंजीत डोक्यात घातला दगड
Kolhapur Crime News कोल्हापूर: कोल्हापूरच्या इचलकरंजीतील (Kolhapur Crime News) कबनूर इथ मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाइप घालून निघृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पंकज संजय चव्हाण, रोहित जगन्नाथ कोळेकर , विशाल राज लोंढे आणि आदित्य संजय पोवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या खून प्रकरणातील चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात अटक केली.
आणखी वाचा
Comments are closed.