बीजेडीचे माजी खासदार समंतराय यांचा भाजपमध्ये प्रवेश

भुवनेश्वर

ओडिशातील माजी राज्यसभा खासदार देवाशीष सामंतराय यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बीजू जनता दलाला रामराम ठोकत सामंतराय यांनी हा निर्णय घेतला आहे. सामंतराय यांनी सोमवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राज्यसभा सदस्यत्वाचाही त्याग केला होता. बीजदमध्ये सातत्याने दुर्लक्षित केले जात होते. दीर्घकाळापर्यंत मुख्यमंत्री राहिलेले नवीन पटनायक यांचा निकटवर्तीय असूनही मला पक्षप्रमुखांना भेटू दिले जात नव्हते, असा आरोप त्यांनी केला होता.

Comments are closed.