भाजपच्या माजी खासदारानेच पक्षाची अब्रू वेशीवर टांगली, म्हणाला, ‘भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी मा
भंडारा: भंडाऱ्याच्या तुमसर इथं नगरपालिका निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. तुमसरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपमध्ये (BJP) बंडखोरी झाली आहे. भाजपचे तीन वेळा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदा खासदार राहिल्यानंतर भाजपमध्ये घरवापसी करणाऱ्या मधुकर कुकडेंचा (BJP MP Madhukar Kukde) पुतण्या आशिष कुकडेंना भाजपनं शेवटच्या क्षणी डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. यामुळं भाजपमध्ये तुमसरात बंडखोरी झाली आहे. माजी खासदार असलेल्या मधुकर कुकडेंच्या (BJP MP Madhukar Kukde) पुतण्यानं ही बंडखोरी केली असून त्याच्या पाठीशी स्वतः माजी खासदार राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू केली आहे. याबाबत कुकडे यांनी एबीपी माझाची बातचीत करताना भाजपला आता निवडणूक लढविण्यासाठी माणसांची नाहीतर, पैशाची गरज आहे. आणि पक्षात मान राहिला नसल्यानं राजकारणातली इमानदारी टिकून राहावी, यासाठी पुतण्याला पाठिंबा देऊन त्याच्या बंडखोरीला समर्थन करीत असल्याचा खळबळजनक आरोप मधुकर कुकडे यांनी भाजपवर केला आहे. (BJP MP Madhukar Kukde)
आशिष कुकडेंनी भाजपला तिकीट मागितली होती. भाजपने 100 टक्के आशिषला तिकीट द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. आणि भाजपही तिकीट देईल, असा विश्वास होता. पूर्ण संकेत होते. मात्र, प्रदीप पडोळे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि घाबरून जाऊन भाजपने त्यांना तिकीट दिली. मी तीन वेळेस आमदार आणि एक वेळा खासदार असून भाजप नेते परिणय फुके यांना आशिषसाठी तिकीट मागितली होती. परिणय फुके, बाळा अंजनकर, उपेंद्र कोठेकर यांनी पॉझिटिव्ह रिसपॉन्स दिल्यानंतर आशिषला निवडणुकीच्या तयारीला लावलं.मागील चार महिन्यांपासून नगरपालिकेची माझी तयारी चालू आहे.मी तीन वेळचा कुणबी समाजाचा आमदार आणि एकदा खासदार राहिलेला असतानाही माझ्या शब्दाला पक्षात मान राहिला नाही.त्यामुळं मी निर्णय घेतलाय की, एकदा निवडणूक लढायची. आशिषला तिकीट नं मिळणे म्हणजे माझी पक्षात किंमत शून्य आहे.माझी गावातील इमेज वाचविण्यासाठी आणि राजकारणात ईमानदारी करण्यासाठी आम्ही लढू.
आदरणीय फुके साहेब म्हणतात की, निवडणुकीला पैसे लागतात. मी म्हणालो, जेवढी प्राथमिक गरज आहे, तेवढा मी खर्च करायला तयार होतो. दारूवर मी पैसे खर्च करायला तयार नव्हतो. लोकांना 100 रुपये लागत असेल तर, मला 10 रुपये खर्च येतो, ही मी सांगितलं. मी 15 वर्ष भाजपचा आमदार राहिलो…पण कधीही पैसे पाहून तिकीट दिलं नाही. तर, जात बघून नाही तर, माणसं बघून तिकीट दिल्या जातं होतं, पुतण्या आशिषच्या बंडखोरीमुळे भाजपनं माझ्यावर शिस्तभंगची कारवाई करावी, मी घाबरतं नाही, असंही माजी खासदार मधुकर कुकडे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.