भूसंपादन मावेजा घोटाळा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन
बीड जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने बुधवारी (दि.१४ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर मागील काही महिन्यांपासून पाठक कारागृहात होते.
बीड जिल्ह्यातून जाणार्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी देण्यात येणार्या १५४ प्रकरणांमध्ये मागील तारखांचे आदेश तयार करून एकुण २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. त्यातील ७३ कोटी ४ लाख रुपये वितरित करण्यात आले होते. या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एसआयटीने पाठक यांना लातूर येथून अटक केली होती.
Comments are closed.