स्वातंत्र्याच्या 78 वर्षांच्या इतिहासात घटनात्मक संस्थांची एवढी अधोगती कधीच झाली नव्हती, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
देशाच्या न्यायव्यवस्था आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरन्यायाधीशांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत जाहीर टीका केल्याप्रकरणी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका ज्येष्ठ वकिलाने न्यायालयाच्या कामकाजाबाहेरील घडामोडींवर बोट ठेवत सरन्यायाधीशांवर कडाडून टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांच्या इतिहासात आपल्या घटनात्मक संस्थांची एवढी बेइज्जती आणि अधोगती कधीच झाली नव्हती, अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक ज्येष्ठ वकील थेट देशाच्या सरन्यायाधीशांना ‘बोगस, चोर आणि पंतप्रधानांचे एजंट’ म्हणून जाहीरपणे हिणवतायत, तर दुसरीकडं सोशल मीडियावर ‘Gen-Z’ पिढी देशाच्या सर्वोच्च पदांची अक्षरशः नक्कल करून सर्रास शिवीगाळ करतेय. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांच्या इतिहासात आपल्या घटनात्मक संस्थांची एवढी बेइज्जती आणि अधोगती कधीच झाली नव्हती असा संताप व्यक्त केला आहे.
एक ज्येष्ठ वकील थेट देशाच्या सरन्यायाधीशांना ‘बोगस, चोर आणि पंतप्रधानांचे एजंट’ म्हणून जाहीरपणे हिणवतायत, तर दुसरीकडं सोशल मीडियावर ‘Gen-Z’ पिढी देशाच्या सर्वोच्च पदांची अक्षरशः नक्कल करून सर्रास शिवीगाळ करतेय.. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांच्या इतिहासात आपल्या घटनात्मक संस्थांची एवढी बेइज्जती आणि अधोगती कधीच झाली नव्हती.
आणि या सर्व अराजकतेला सर्वस्वी भाजप आणि त्यांचे अंधभक्त जबाबदार आहेत! कोणत्याही लोकशाहीप्रेमी नागरिकासाठी हे चित्र अत्यंत वेदनादायी आणि निराशाजनक आहे.
हे बदलण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत आणि एकजूट दाखवली तर हे अशक्य नाही…!#संविधान #लोकशाही
– रोहित पवार (@RRPSpeaks) 14 ऑक्टोबर 2026
या अराजकतेला पूर्णपणे सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत रोहित पवार पुढे म्हणाले की, या सर्व अराजकतेला सर्वस्वी भाजप आणि त्यांचे अंधभक्त जबाबदार आहेत. कोणत्याही लोकशाहीप्रेमी नागरिकासाठी हे चित्र अत्यंत वेदनादायी आणि निराशाजनक आहे. हे बदलण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत आणि सर्वांनी एकजूट दाखवली तर हे अशक्य नाही, असा विश्वासही त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
Comments are closed.