मोठी बातमी! केविन पीटरसन इंग्लंड संघात परतला, 2027 वर्ल्डकपच्या पार्श्वभुमीवर मिळाली ‘ही’ नवी जबाबदारी

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा वादग्रस्त शेवट झाल्यानंतर 12 वर्षांनी, केविन पीटरसन पुन्हा संघात परतला आहे. 2027 वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभुमीवर त्याला इंग्लंड पुरुष संघामध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे.
केविन पीटरसनची इंग्लंडच्या पुरुष ‘व्हाइट-बॉल’ संघांसाठी विशेष मार्गदर्शक (स्पेशालिस्ट मेंटॉर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पीटरसन या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या व्हायटॅलिटी आयटी20 आणि मेट्रो बँक एकदिवसीय मालिकेसाठी ब्रेंडन मॅककुलमच्या व्हाईट बॉल संघात सामील होईल. त्याच्या प्रशिक्षक संघात मार्कस ट्रेस्कोथिक, टिम साउथी, जीतन पटेल आणि सारा टेलर यांचाही समावेश असेल.
केविन पीटरसन त्याला मिळालेल्या नव्या जबाबदारीबाबत म्हणाला “दक्षिण आफ्रिकेत विश्वचषक जिंकण्याच्या प्रवासात या संघाला मदत करण्याची संधी मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. 2014 नंतर प्रथमच पुन्हा इंग्लंडचा गणवेश परिधान करणे हा एक मोठा सन्मान आणि अत्यंत खास क्षण आहे.”
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅक्युलम यानेही आपले मत व्यक्त केले. त्याने म्हटले, “केपीबद्दल आणि त्याने या खेळात जे काही मिळवले आहे त्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्याने इंग्लिश क्रिकेटवर एक अद्भुत प्रभाव टाकला आहे, त्यामुळे त्याच्यासारख्या अनुभवी, ज्ञानी आणि प्रतिष्ठित व्यक्तीने या संघात भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त करणे, ही एक विलक्षण गोष्ट आहे.”
(इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनची इंग्लंडच्या व्हाईट-बॉल कोचिंग टीममध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.)
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.