Duleep Trophy 2026 – चर्चा वैभवची, पण ईशाननं मैदान गाजवलं; फायनलमध्ये द्विशतक ठोकत सुवर्ण अक्षरात नाव कोरलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानावर पूर्व विभाग आणि दक्षिण विभागामध्ये दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना सुरू आहे. पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशन याने अंतिम सामन्यात द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे. ईशान किशन याने 270 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने 26 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. 250 धावा पूर्ण झाल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला.

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक ठोकणारा ईशान सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी रमन लांबा, यशस्वी जैस्वाल, चेतेश्वर पुजारा, अंशुमन गायकवाड, युसूफ पठान आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी दुलीप ट्रॉ़फीच्या अंतिम सामन्यात द्विशतक ठोकण्याची कामगिरी केलेली आहे. तसेच अंशुमन गायकवाड (1987) नंतर अंतिम सामन्यात द्विशतक ठोकणारा ईशान दुसराच कर्णधार ठरला आहे.

Comments are closed.