माजी लष्करी अधिकारी चिनी हेरांनी लक्ष्य केले

लेखाच्या नावावर सैन्याच्या गुप्त माहितीची मागणी दलाचा प्रशिक्षण कार्यक्रम आणि कॉम्बॅट एव्हिएशन टॅक्टिक्सची माहिती पुरवत होते असा आरोप आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने दोन्ही आरोपी वैमानिकांच्या विरोधात खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत.

चीनने आता भारतासमवेत अनेक अन्य देशांच्या माजी सैन्याधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे सत्र आरंभिले आहे. माजी वैमानिक किंवा नौदल अधिकाऱ्यांना भूराजकारण, संरक्षण खरेदी, सैन्यसरावर आणि देशाच्या लढाई लढण्याच्या पद्धतींवर लेख अन् संशोधनपत्र लिहिण्याची ऑफर चीनच्या हेरांकडून दिली जात आहे. यादरम्यान या माजी सैन्याधिकाऱ्यांकडून त्यांचे अनुभव आणि अंतर्गत माहिती मागितली जात असून याच्या बदल्यात त्यांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात येत आहे.

सैन्याच्या माजी अधिकाऱ्यांना अडकविण्याचा कट

-चिनी हेरांनी माजी सैन्याधिकाऱ्यांना अडकविण्यासाठी लिंक्डइन, इनडीड आण नौकरीडॉटकॉम यासारख्या मेनस्ट्रीम प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्सची मदत घेतली आहे.

-चिनी रिक्रूटर पीएचडी करत असलेले विद्यार्थी किंवा थिंक टँकमध्ये इंटर्न असल्याचे भासवत या माजी अधिकाऱ्यांना स्वत:च्या सापळ्यात अडकवू पाहतात.

-चिनी हेर प्रत्येक लेखासाठी 300 ते 500 डॉलर्सची ऑफर देत असून ही रक्कम अत्यंत मोठी असल्याने अनेक जण या सापळ्यात अडकले असावेत.

-याचबरोबर सल्लागार म्हणून एका कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळण्याचा प्रस्ताव या माजी सैन्याधिकाऱ्यांना चिनी हेरांकडून दिला जात आहे.

-प्रारंभी लेखाचे विषय साधारण असू शकतात, परंतु लवकरच रिक्रूटर खास विषयावर लेख/संशोधनपत्राची मागणी करू लागत असल्याचे समोर आले आहे.

-रिक्रूटर संरक्षणाशी निगडित धोरणे, शस्त्रास्त्रप्रणाली, संरक्षण खरेदीच्या पद्धती, सैन्याभ्यास आणि सैनिकाची तैनात, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन यावर माहिती मागतात.

-संरक्षणपत्रकार, सैन्यव्यूहनीतिकार आणि माजी सैन्याधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप, फेसबुक, लिंक्डइन, इंडीड अन् जॉब पोर्टल्सवर अशा ऑफर्ससोबत संपर्क साधण्यात आला आहे.

भारताच्या माजी अधिकाऱ्यांशी संपर्क

-एका माजी रियर अॅडमिरल आणि एका माजी कर्नलने मोठ्या रकमेची ऑफर मिळाल्याची पुष्टी दिली आहे. रियर अॅडमिल (निवृत्त) गिरीश कुमार गर्ग यांच्याशी लिंक्डइनवर हाँगकाँगच्या दोन विद्यार्थ्यांना संपर्क साधला होता. आम्ही हाँगकाँग विद्यापीठात पीएचडीचे विद्यार्थी आहोत. तसेच आंतरराष्ट्रीय संबंध आणि भूराजकारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका एनजीओसोबत जोडलेले आहोत. संरक्षण अन् भूराजकारणावर चांगली पकड असलेल्या प्रतिष्ठित लोकांशी जोडले जाऊ इच्छितो असा दावा या कथित विद्यार्थ्यांनी केला होता. मी एक लेख पाठविला होता, त्यानंतर लेख ओपन सोर्स इंटेलिजेन्स आधारित असू नये तर त्यात अंतर्गत माहिती असायला हवी असे कळविण्यात आले होते. माझ्याकडून त्यांना संरक्षण व्यवहार आणि गुप्त तसेच संवेदनशील माहिती हवी होती असा दावा गर्ग यांनी केला आहे. याचबरोबर चिनी हेरांना गर्ग यांना स्वत:च्या प्रभावाचा वापर करत सैन्यासंबंधी अंतर्गत माहिती मिळविण्यास सांगण्यात आले होते. चिनी हेरांची रुची खासकरून भारताच्या भविष्यात होणाऱ्या संरक्षण खरेदीत होती.

कोट्स

चिनी हेरांनी माझ्याशी देखील संपर्क साधला होता. तसेच लेख लिहिण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर दिली होती. मला ही ऑफर हाँगकाँगच्या काही विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यांनी आपण दक्षिण आशियावर काम करणाऱ्या एका थिंकटँकशी संबंधित असल्याचा दावा केला होता. ते माझ्याकडून भारतीय सैन्याच्या युद्ध रणनीतिंवर संशोधनपत्र लिहून घेऊ इच्छित होते.

भारतीय सैन्याचा निवृत कर्नल (नाव उघड करण्यात आलेले नाही)

Comments are closed.