पक्ष सोडून गेल्यावर काय फरक पडतो ते पुढे कळेल, संजय कदमांचं मोठं वक्तव्य, ठाकरेंना धक्का?

संजय कडम: अनेक पक्षांकडून मला पक्षात येण्यासाठी आमंत्रण येत असल्याचे वक्तव्य दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना ठाकर गटाचे नेते संजय कदम (संजय कदम) यांनी केलं. रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो., मात्र पक्षांतराच्या बाबतीत मी माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे कदम म्हणाले. पक्षीय वादातून रामदास कदम आणि माझ्यात संघर्ष होता. रामदास कदम यांनी माझ्या पक्ष प्रवेशाच्या भूमिकेबाबत केलेल्या वक्तव्याचे मी स्वागत करतो असेही कदम म्हणाले.

अनंत गीतेंनी त्यांची निवडणूक उरकून घेतली आणि आमच्या निवडणूक काळात फिरकलेही नाहीत

माझ्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या लोकांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केल्याचा आरोप संजय कदम यांनी केला. मी पक्ष सोडून गेलो तर काय फरक पडतो ते पुढे कळेल असेही कदम म्हणाले. शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी त्यांची निवडणूक उरकून घेतली आणि आमच्या निवडणूक काळात फिरकले देखील नाहीत अशी टीका देखील गीते यांच्यावर कदम यांनी केली. नेतेच असे वागत असतील तर कार्यकर्ता काय करणार? असा सवाल करत माजी आमदार संजय कदम यांनी पहिल्यांदाच खंत बोलून दाखवली. उद्धव ठाकरे गट सोडण्याच्या बातमीला संजय कदम यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

संजय कदम पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन

माजी आमदार संजय कदम  (Former MLA Sanjay Kadam) यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर रामदास कदम यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय कदम यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते पक्षात येणार असतील तर मी पायघड्या घालेन असेही रामदास कदम म्हणाले. कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे. रामदास कदम आणि संजय कदम यांनी एकत्र स्नेहभोजन केल्याची देखील माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळं आता संजय कदम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच संजय कदम यांनी देकील पक्ष बदलाच्या चर्चांना दुजोरा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, रामदास कदमांना अंगावर घेणारा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

अधिक पाहा..

Comments are closed.