गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या ‘वर तोंड करून

जळगाव: अकोल्यात गॅस सिलिंडरच्या रांगेत एका वृद्धाला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (rohini Khadse) यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यावरून “सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांना त्यांचे नाव न घेता सुनावले आहे. तसेच जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा ! असंही रोहिणी खडसे संतापून म्हणाल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना २५ दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सांगितले होते. त्यावरून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावरती नाव न घेती टीका केली आहे.

सोशल मिडीया पोस्टमध्ये रोहिणी खडसेंनी नेमकं काय म्हटलं?

रोहिणी खडसेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा ! अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे. “सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी.

माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचे दुर्दैवी निधन

अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे धक्कादायक घटना घडली असून गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात (Akola) प्रशासनाविरुद्ध संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दु:खद घटनेबाबत शोक देखील व्यक्त केला जात आहे, विशेष म्हणजे संबंधित वृद्ध हे माजी सरपंच आहेत गॅसच्या रांगेत उभारेलेल्या अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचे दुर्दैवी निधन झाले. यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.