यूपीचे माजी राज्यमंत्री अनिल शर्मा यांचे निधन.
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशमधील माजी राज्यमंत्री आणि भाजप आमदार अनिल शर्मा (वय 63 वर्षे) यांचे बुधवार, 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते शिकारपूर मतदारसंघातून निवडून आले होते. दिल्लीतील बीएल कपूर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जिह्यात शोककळा पसरली आहे. बुलंदशहरमधील सुरजावली गावचे रहिवासी अनिल शर्मा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच म्हणून केली होती. ते शिकारपूर मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मागील भाजप सरकारमध्ये वन राज्यमंत्री होते.
Comments are closed.