French Open मध्ये मोठा उलटफेर; अव्वल मानांकित जॅनिक सिन्नरला पराभवाचा धक्का, ग्रँडस्लॅमचं स्वप्न धुळीस
टेनिस जगताला थक्क करणाऱ्या एका अत्यंत रोमांचक सामन्यात, फ्रेंच ओपनचा प्रबळ दावेदार आणि अव्वल मानांकित जॅनिक सिन्नरला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी (27 मे 2026) रोलाँ गॅरोस येथे झालेल्या लढतीत अर्जेंटिनाच्या बिगरमानांकित हुआन मॅन्युएल सेरुंडोलोने सिन्नरचा 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 असा पराभव केला. पॅरिसमधील 33 अंश सेल्सिअसच्या कडक उन्हात आणि प्रचंड उकाड्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात सिन्नरने पहिले दोन सेट जिंकून दमदार सुरुवात केली होती. तिसऱ्या सेटमध्येही त्याने 5-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती, मात्र यानंतर त्याला अचानक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले आणि सामनाही हातातून निसटला.
तिसऱ्या सेटमध्ये 5-4 आणि 0-40 अशी स्थिती असताना, प्रचंड घाम गाळल्यामुळे पूर्णपणे भिजलेला 24 वर्षीय सिन्नर कोर्टवरच थकला आणि त्याने वैद्यकीय मदतीची मागणी केली. मानेभोवती आईस पॅक गुंडाळून कोर्टवर परतल्यानंतरही तो लयीत येऊ शकला नाही आणि त्याने सलग तीन सेट गमावले. गतविजेत्या कार्लोस अल्काराझच्या अनुपस्थितीत सिन्नरसाठी ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ही सुवर्णसंधी मानली जात होती. तसेच फेब्रुवारीपासून सलग 30 सामने जिंकण्याची त्याची विजयी घोडदौडही या धक्कादायक पराभवामुळे खंडित झाली असून, त्याला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे.
Comments are closed.