यशच्या ‘टॉक्सिक’ची क्रेझ शिगेला; तिकिटांचे दर थेट 3600 रुपयांवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कन्नड सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक : अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तब्बल चार वर्षांनंतर यश मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असून, चित्रपट 26 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वीच ‘टॉक्सिक’च्या अॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत असून, काही शहरांमध्ये प्रीमियम तिकिटांचे दर तब्बल 3600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

‘टॉक्सिक’च्या प्रीमियम स्क्रीनिंगसाठी तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबईत काही प्रीमियम शोसाठी तिकिटांची किंमत सुमारे 2700 रुपये, तर दिल्लीत काही ठिकाणी ती 2400 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बंगळुरूमध्ये तर काही प्रीमियम शोसाठी चाहत्यांना तब्बल 3600 रुपये मोजावे लागत आहेत.

विशेष म्हणजे, बंगळुरूमधील INOX M5 ECity येथे 3600 रुपयांची काही तिकिटे विकली गेल्याचे वृत्त आहे. यावरून यशच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ स्पष्ट होते. टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार तिकिटांचे दर वाढले असतानाही ‘टॉक्सिक’च्या अॅडव्हान्स बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 24 ऑगस्टपर्यंत चित्रपटाची 6 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्लॉक केलेल्या सीट्ससह अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने 30 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचेही वृत्त आहे.

चित्रपटाची मागणी वाढत असल्याने मुंबईतील काही चित्रपटगृहांनी पहाटे आणि रात्री उशिराचे अतिरिक्त शोही सुरू केले आहेत. काही ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून, तर काही ठिकाणी रात्री 11.45 वाजेपर्यंतचे शो ठेवण्यात आले आहेत.

Comments are closed.