शेवटी मिशनला आणखी विलंब होतो

फेब्रुवारीपूर्वी पहिली मानवरहित उड्डाण मोहीम अशक्य : तांत्रिक चाचण्या अन् सुरक्षिततेच्या पडताळणीमुळे विलंब

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेला पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची डिसेंबर 2026 मध्ये नियोजित असलेली पहिली मानवरहित चाचणी मोहीम आता फेब्रुवारी 2027 पूर्वी प्रक्षेपित होण्याची शक्यता कमी आहे. तांत्रिक सुधारणा, अतिरिक्त सिम्युलेशन चाचण्या आणि विविध यंत्रणांच्या अंतिम पडताळणीमुळे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर आणि यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गगनयान मोहिमेचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, अंतराळयान आणि प्रक्षेपण यानाला उ•ाणासाठी अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी काही महत्त्वाच्या तांत्रिक चाचण्या पूर्ण करणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असल्याने इस्रो कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत आहे. अंतराळवीरांच्या जीविताशी संबंधित असल्यामुळे प्रत्येक यंत्रणेची काटेकोर तपासणी केली जात आहे. यासाठी अतिरिक्त सिम्युलेशन आणि तांत्रिक पडताळणी सुरु आहे. मोहिमेच्या निश्चित वेळापत्रकापेक्षा सुरक्षिततेला अधिक महत्त्व देण्याची भूमिका इस्रोने घेतली आहे.

व्योममित्र रोबोटची अंतराळवारी

गगनयान मोहिमेच्या पहिल्या मानवरहित उ•ाणाला ‘जी-1’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत व्योममित्र हा अर्धमानवाकृती रोबोट अंतराळात पाठविण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे अंतराळयानातील जीवनरक्षक प्रणाली, क्रू मॉड्यूल, प्रक्षेपण यानाची कार्यक्षमता आणि पृथ्वीवर सुरक्षित पुनरागमन करण्याच्या यंत्रणेची तपासणी केली जाणार आहे.

तीन मानवरहित मोहिमा

गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेनंतर आणखी दोन मानवरहित उ•ाणे नियोजित आहेत. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळवीरांना स्वदेशी प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात पाठविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जानेवारी 2019 मध्ये मंजुरी मिळालेल्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी सुरुवातीला 2022 चे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र कोरोना महामारी, उत्पादनातील अडथळे आणि तांत्रिक आव्हानांमुळे वेळापत्रकात अनेकदा बदल करावा लागला. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष इस्रोच्या पुढील चाचण्यांकडे लागले आहे.

Comments are closed.