सिनेसृष्टीत खळबळ! रेमो डिसूझाकडून 50 लाखांची खंडणी, गँगस्टर रवी पुजारी अटकेत

गँगस्टर रवी पुजारीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मनोरंजन सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझाकडून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. गँगस्टर रवी पुजारीने 50  लाखांची खंडणी  मागितली होती.  आरोपीनं रेमो डिसूझाला आणि त्याच्या पत्नीला वारंवार फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दरम्यान, हे प्रकरण समोर येताच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली असून,  आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पुजारीनं 2018 साली 50 लाखांची खंडणी मागितली होती. याच प्रकरणात त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यापासून आरोपी रवी पुजारी हा तुरूंगातच होता.  दरम्यान, रेमो डिसूझाकडून  खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली नव्हती.    दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला 22 जानेवारीला  न्यायालयात हजर केले.  न्यायालयाने आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  तो सध्या अटकेत आहे.  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  यापूर्वी याच प्रकरणातील आरोपी सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून पुजारीने रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नीला धमकी दिली. ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत आरोपी रवी पुजारीनं रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूझाला धमकी दिली.

तसेच त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा डाव रचला. आरोपीनं डिसूझाच्या मॅनेजरला फोन करून धमकी दिली.  पुजारीनं डेथ ऑफ अमर हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी दबाव आणला होता.  हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यानं 50 लाख रूपयांची मागणी केली होती.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमो आणि सत्येंद्र त्यागी  यांच्यात  2018 मध्ये  अमर जस्ट डाय नावाच्या चित्रपटासाठी करार केला होता.   दरम्यान, दोघांमध्ये चित्रपटाच्या हक्कांवरून   तसेच निधीवरून वाद झाले. सत्येंद्र त्यागीने असा दावा केला की, संबंधित चित्रपटात त्याने गुंतवणूक केली होती.  तसेच रेमो डिसूझावर 5 कोटी  रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा  आरोप केला. यानंतर पुजारीनं रेमो डिसूझाच्या मॅनेजरला धमकावण्यास सुरूवात केली.  तसेच ५० लाखांची खंडणी मागितली.  याच वादातून धमकीच्या सत्राला सुरुवात झाल्याचा रेमोचा आरोप होता.

दरम्यान, याच प्रकरणात तब्बल आठ वर्षांनंतर पुजारीवर कारवाई करण्यात आली. गँगस्टार रवी पुजारीला अटक करण्यात आली असून, त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.