DC vs KKR सामन्यात अचानक गौतम गंभीरची एन्ट्री! निवडकर्त्यांसोबत बघितला सामना, टीम इंडियात होणार
गौतम गंभीर डीसी विरुद्ध केकेआर आयपीएल सामन्यात उपस्थित होता: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर शुक्रवारी (8 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचले. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत निवड समितीचे सदस्य आर.पी. सिंग देखील होते. मैदानावर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग यांच्यात बराच वेळ दीर्घ चर्चा सुरू होती. बीसीसीआयचे निवडकर्ते आयपीएल 2026 मधील उदयोन्मुख खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. अशातच मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता यांच्यातील या संभाषणाने चाहत्यांचे आणि क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांच्यासोबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील उपस्थित होते.
गौतम गंभीर, केकेआरचा दोन वेळा आयपीएल विजेता कर्णधार आणि माजी डीसी कर्णधार ❤️
दोन्ही चाहत्यांनी प्रशंसा केलेला नेता येथे आहे. 🙌🏻#TATAIPL रिव्हेंज वीक २०२६ ➡️ #DCvKKR | आता थेट 👉https://t.co/Kg31E4o7KB pic.twitter.com/CnPEZL9EEU
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 8 मे 2026
गौतम गंभीरसाठी दोन्ही संघ खास
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. तसेच, 2024 मध्ये तो या संघाचा मेंटॉर असताना संघाने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. तर गंभीरने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात दिल्लीच्या संघातूनच केली होती आणि कारकिर्दीतील शेवटचा सामनाही याच संघासाठी खेळला होता. महत्त्वाची गोष्टी म्हणजे गंभीर जवळपास २ वर्षांनंतर मैदानात बसून आयपीएल सामन्याचा आनंद घेताना दिसला. आगामी आंतरराष्ट्रीय दौरे आणि टीम इंडियाची भविष्यातील रणनीती पाहता, निवडकर्त्यांसोबतची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
टीम इंडियात होणार मोठे फेरबदल?
सूर्यकुमार यादवच्या जागी टी-20 फॉरमॅटसाठी बीसीसीआय नवीन कर्णधाराचा विचार करत आहे. यापूर्वी, केकेआरला विजेतेपद मिळवून देणारा आणि दिल्ली व पंजाबला अंतिम फेरीत पोहोचवणारा श्रेयस अय्यर नवीन कर्णधार म्हणून नियुक्त होऊ शकतो, असे वृत्त होते. मात्र, आता एका वृत्तानुसार संजू सॅमसनला नवीन टी-20 कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
रोहित शर्माने 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. यानंतर, बीसीसीआयने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड केली. 50 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या सर्व कर्णधारांमध्ये (धोनी, रोहित आणि कोहली) सूर्याची विजयाची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने यावर्षी टी-20 विश्वचषकही जिंकला, परंतु भविष्याचा विचार करून बीसीसीआय नवीन कर्णधाराची घोषणा करू शकते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.