रोहित-विराट वर्ल्ड कप 2027 खेळणार?; कोच गौतम गंभीरचं एका वाक्यात स्पष्ट करुन टाकलं, सर्वांनाच ध
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणारा वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup 2027) खेळणार की नाही? असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आता यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी एका वाक्यात आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, त्या स्पर्धेला अजून दोन वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक आहे आणि सध्या लक्ष्य आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केंद्रित करणे आवश्यक आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात आणि आता ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील.
विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत गंभीर काय म्हणाला?
सामन्यानंतर पत्रकार परिषद बोलताना गंभीर म्हणाला की, “विराट आणि रोहित हे दर्जेदार खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव संघासाठी अनमोल आहे. 2027 विश्वकप अजून साडे-दोन वर्षांवर आहे, त्यामुळे आत्ताच्या क्षणावर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. आशा आहे की त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी ठरेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघ एकूणच दमदार कामगिरी करेल.”
रोहितने केलं दहा किलो वजन कमी
गेल्या दोन दशकांत या दोन्ही दिग्गजांनी भारतीय संघासाठी अपूर्व योगदान दिले आहे. त्यांच्या खेळामुळेच भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटला एक वेगळी ओळख मिळाली आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ते पुन्हा एकदा ‘ब्लू जर्सी’मध्ये मैदानात उतरणार आहेत. रोहित सध्या मुंबईत फिटनेसवर काम करत आहे, त्याने जवळपास दहा किलो वजन कमी केले आहे. तर विराट लंडनमध्ये स्वतःची लय परत मिळवण्यासाठी तयारी करत आहेत.
2024 च्या टी20 विश्वकप जिंकल्यानंतर या दोघांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर यंदाच्या मे महिन्यात त्यांनी कसोटी क्रिकेटपासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ते फक्त वनडे फॉरमॅटसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी अलीकडेच सांगितले की, दोघांनी अद्याप आपल्या भविष्यासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही आणि योग्य वेळ आल्यावरच निर्णय घेतला जाईल.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus Schedule)
- पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
- दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अॅडलेड ओव्हल)
- तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)
- पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)
- दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)
- तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)
- चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)
- पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया मायदेशी परतेल, जिथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका होईल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.