ड्रायव्हरने देवदर्शनाला जाण्यासाठी कार नेली; मला विनाकारण दोष दिला जातोय; गौतमी पाटील सगळ्यावर


पुणे : काही दिवसांपासून नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) चांगलीच चर्चेत आली आहे, त्याचं कारण म्हणजे तिच्या कारचा झालेला अपघात (Car Accident). काही दिवसांपूर्वी नवले पूल परिसरात एका कारने रिक्षाला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातग्रस्त कार नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिची होती. त्यानंतर जखमी व्यक्तीच्या घरच्यांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले. त्या अपघातावेळी गौतमी (Gautami Patil) कारमध्ये होती असाही आरोप होता,  त्यानंतर भाजप नेते अन् राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यास फोन लावून गौतमी पाटीलला (Gautami Patil) उचलणार आहात की नाही, अशी विचारणा केली. याचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापलं. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांना देखील घटनेची सर्व माहिती दिली, त्यानंतर चौकशी आणि तांत्रिक बाबी तपासल्यानंतर गौतमी त्या अपघातावेळी कारमध्ये नसल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने काल (बुधवारी दि. ८) पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.(Gautami Patil)

Gautami Patil: देवदर्शनासाठी जातो म्हणून कार नेली…

गौतमी म्हणाली, देवदर्शनासाठी जातो म्हणून तिच्या कार चालकाने तिची गाडी नेली होती. त्यानंतर त्याच्याकडून तो अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाणे योग्य नव्हते. तो जे वागला ते चुकीचे आहे. मात्र, अपघातावेळी मी नसतानाही मला ट्रोल केलं जात आहे. ट्रोल होणं माझ्यासाठी काही नवीन नाहीये. मात्र, अशा प्रकारे मी तिथे उपस्थित नसताना देखील मला दोष देणं चुकीचं आहे. अपघात झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र, संबंधितांनी मदत नाकारली, या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला होता, हा आरोप चुकीचा आहे, अशी माहिती गौतमीने पत्रकार परिषदेत दिली आहे.

Gautami Patil: चंद्रकांत पाटलांच्या व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना म्हणाली…

चंद्रकांत पाटील यांना अपघाताच्या संदर्भात सविस्तर माहिती नव्हती, त्यामुळे ते गौतमी पाटीलला उचलणार की नाही? असे पोलिस अधिकाऱ्यांना बोलले. मात्र, समोरील अधिकाऱ्यांनी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. मात्र, दादांच्या बोलण्याचे मला वाईट वाटले, अशी भावना गौतमी पाटीलने यावेळी बोलताना व्यक्त केली.

पुढे ती म्हणाली, समोरून लाखो रुपयांची मागणी करणारे निरोप येत आहेत. माझ्याशी अद्याप थेट कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यांची मागणी माझ्या आवाक्या बाहेरची आहे. त्यामुळे जे काय होईल ते कायद्यानुसार व न्यायालयाच्या आदेशानुसारच होईल, असंही गौतमीने यावेळी स्पष्ट केलं आहे.

Gautami Patil: दोषी नसतानाही मला दोष देण्यात येत आहे

अपघातानंतर कारवाई ही नेहमी चालकावरच होते, मग गाडीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी अन्यायकारक आहे, असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले. तिने पुढे सांगितले, “दररोज अनेक अपघात घडतात, पण त्यात गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल केला जात नाही, कारवाई चालकावरच होते. मी कलाकार असल्यामुळे माझ्यावर मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. अपघाताच्या वेळी मी त्या गाडीत नव्हते, तरीही मला दोषी ठरवले जात आहे, हे समजत नाही. अपघातानंतर पोलिसांना आवश्यक सर्व माहिती आणि कागदपत्रे मी दिली आहेत. आतापर्यंत पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असून, पुढेही तेच करत राहणार आहे. दादांना (माझ्या भावांना) अपघाताबद्दल सुरुवातीला काही माहिती नव्हती. त्यांनी फोन करून विचारल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून सर्व तपशील त्यांना मिळाला. त्यामुळे त्या विषयावर मला काही भाष्य करायचं नाही,मात्र, त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाईट वाटले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला सर्वच बोलतात. मला कोणी चांगले म्हणतच नाहीत. सगळे वाईटच बोलतात. दोषी नसतानाही मला दोष देण्यात येत आहे”असंही तिने म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Q8R3Q0ZD1T8

आणखी वाचा

Comments are closed.