Gautami Patil: गौतमी पाटीलचा इंदापुरातला शो बंद पडणार; गनिमी कावा सेवा संघटनेचा इशारा
इंदापूरमधील गौतमी पावेल: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मंगळवारी इंदापूरमध्ये होणारा कार्यक्रम बंद पाडण्याचा इशारा गनिनी कावा संघटनेने दिला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील नवले पुलाजवळ (Pune Navale Bridge) गौतमी पाटीलच्या कारचालकाने एका रिक्षाला धडक (Road Accident) दिली होती. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. यानंतर गौतमी पाटील (Gautami Patail) हिचा कारचालक घटनास्थळावरुन पळून गेला होता. या प्रकरणामुळे गौतमी पाटील ही अडचणीत सापडली होती. अपघाताच्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये होती, असा आरोपही झाला होता. मात्र, पोलीस तपासानंतर ती गाडीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी दिला क्लीन चिट दिली होती.
मात्र, यानंतरही संबंधित रिक्षाचालकाचे नातेवाईक आक्रमक आहेत. अशातच गनिमी कावा संघटनेने या वादात उडी घेत गौतमी पाटील हिला इशारा दिला आहे. या संघटनेकडून मंगळवारी पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. गौतमी पाटील हिने पुण्यात येऊन पीडित रिक्षाचालकाची भेट घेतली पाहिजे. गौतमी पाटील हिला अद्याप तिची नैतिक जबाबदारी समजलेली नाही. तिने जखमी रिक्षाचालकाची भेट न घेतल्यास आम्ही इंदापूरमधील तिचा आजचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा गनिमी कावा संघटनेकडून देण्यात आला.
Gautami Patil News: पुण्यातील अपघातप्रकरणात पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लिन चीट का दिली?
गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. या रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिला एक नोटीस पाठवली होती. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.अपघाताच्यावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 100 सीसीटीव्हींचे फुटेज पडताळले. त्यामध्ये गौतमी पाटील कारमध्ये नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे पोलिसांनी गौतमीला क्लिन चीट दिली होती.
आणखी वाचा
गौतमी पाटीलला उचलायचं की नाही; चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन, म्हणाले…
आणखी वाचा
Comments are closed.