‘सबसे कातील गौतमी पाटील’ला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट, अपघातावेळी गाडीत नसल्याचा निष्कर्ष


गौतमी पाटील पुणे अपघात: पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला क्लीन चिट मिळाली आहे. पोलीस तपासात अपघाताच्यावेळी गौतमी पाटील (Gautami Patil) ही गाडीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातावेळी (Pune  Accident) गौतमी पाटील वाहनात नव्हती, अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून गौतमी पाटील हिला क्लीन चिट देण्यात आली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांकडून गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले होते. अपघाताच्यावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 100 सीसीटीव्हींचे फुटेज पडताळले. त्यामध्ये अपघातावेळी फक्त गौतमी पाटीलचा चालक हाच कारमध्ये उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Crime news)

गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारने 30 सप्टेंबरला पहाटे एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता. या रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या देत गौतमी पाटील हिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. गौतमी पाटील ही सेलिब्रिटी असल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करताना चालढकल केली जात आहे, असा आरोपही झाला होता. तर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड तापले होते. या अपघात प्रकरणात गौतमी पाटील हिला शुक्रवारी नोटीस धाडली होती. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.  मात्र, या सगळ्या तपासानंतर पोलिसांकडून आता गौतमी पाटील हिला क्लीन चिट देण्यात आली आहे.

Pune crime news: अपघातानंतर गौतमी पाटीलच्या कारचा ड्रायव्हर बदलला?

30 सप्टेंबरला आमचा भाऊ पहाटे पाच वाजता 10 रुपये मिळवण्यासाठी पॅसेंजरची वाट पाहत उभा होता. त्याची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी मागून एक कार आली आणि त्याला ठोकून निघून गेली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा तीनवेळा पलटी आणि आमचा भाऊ जखमी होऊन रस्त्यावर पडला. या अपघातानंतर ज्या कारने धडक दिली, त्यामधील लोक खाली उतरले आणि निघून गेले. मात्र, अर्धा तासाने एक व्यक्ती पुन्हा आला आणि त्याने त्याच्यासोबत टोईंग व्हॅन आणली होती. टोईंग व्हॅनच्या क्रेनने गौतमी पाटीलची कार टो करुन घटनास्थळावरुन नेण्यात आली. मात्र, आमचा भाऊ जखमी अवस्थेत तसाच रस्त्यावर पडून होता. त्याच्याकडे कोणीही बघितले नाही. रिक्षावाल्यांनी वेळीच मदत केली म्हणून आमच्या भावाचा जीव वाचला. वैद्यकीय तपासणीसाठी दुसऱ्याच कोणालातरी आयत्यावेळी ड्रायव्हर म्हणून सादर करण्यात आले. पोलीस हायवेवरील कॅमेरे बंद असल्याचे सांगत आहेत. पुण्यासारख्या शहरात असे कसे होऊ शकते?, असे अनेक सवाल रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले होते.

https://www.youtube.com/watch?v=mda9r1y_tha

आणखी वाचा

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही; चंद्रकांत पाटलांचा थेट DCP ला फोन, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.