कोणीही आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार म्हणतो, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरुन महाजनांचा टोला
गिरीश महाजन: अशोक खरात प्रकरणाची अतिशय पारदर्शकपणे एसआयटीची चौकशी सुरु आहे. एसआयटी कडून रुपली चाकणकरांना समन्स दिले असतील तर त्याचे उत्तर चाकणकर देतील असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही. चौकशीचा भाग म्हणून एसआयटीने चाकणकर यांना बोलावलं असेल असे महाजन म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्याव देखील महाजनांनी प्रतिक्रिया दिली. विलीनीकरण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याबाबत त्यांनी ठरवावं. कोणी एखादा आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार म्हणतो, त्याला आम्ही काय उत्तर देणार, असा टोला महाजन यांनी सुनील शेळकेंना नाव न घेता लगावला.
फक्त गेलं म्हणून चौकशी करा असं राऊत म्हणत असतील तर हजारो लोकांची चौकशी करावी लागेल
एकनाथ शिंदेंना खरात कडे घेऊन जाणारे केसरकर होते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना महाजन म्हणाले की, समाजात असे भरपूर महाराज भविष्यकार आहेत त्यांच्याकडे अनेक लोक जातात. कॉर्पोरेट सामाजिक राजकीय क्षेत्रातले लोक असे अनेक लोक त्यांच्याकडे जातात. आसाराम बापू , राम रहीम यांचे लाखोंच्या संख्येने फॉलोवर्स होते. सर्वांना आपलं भविष्य बघायचं असतं म्हणून अनेकजण जातात. फक्त गेलं म्हणून चौकशी करा असं राऊत म्हणत असतील तर हजारो लोकांची चौकशी करावी लागेल असे महाजन म्हणाले. या प्रकरणात मेन गुन्हेगार कोण आहे हे शोधलं पाहिजे व त्यांची चौकशी झाली पाहिजे असे महाजन म्हणाले,
एपिस्टनला मारलं तसं खरातलाही मारु शकतात असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, खरातला पूर्ण प्रोटेक्शन आहे त्याची काळजी करु नका. वडेट्टीवार असो वा नाना पटोले असो ते काय म्हणतात ते विरोधक आहे ते बोलतीलच.
दीपक केसरकर हे खरातच्या अधिक संपर्कात असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं. यावर बोलताना महाजन म्हणाले की, घरातल्या अनेक जणांना भेटायला गेले होते, मात्र दीपक केसरकर हे कायम त्यांना भेटायचे त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावत असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. मात्र खडसेंचा केसरकरांवर रोष आहे तर मी काय करणार ? असे म्हणत एकनाथ खडसेंवर माझी काही प्रतिक्रिया नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी खरातला भेटलेल्या 39 आमदारांची यादी जाहीर करावी असं वक्तव्य केलं आहे. यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, समाजामध्ये असे अनेक साधुसंत ढोंगी आहेत आता अशा सर्वांचे पितळ उघडे होत आहे. अनेक लोक त्यांच्याकडे हात बघायला व भविष्य बघायला जात असतात अशांची चौकशी व्हावी हा थोडा वेगळा भाग आहे. त्यामुळे याबाबत कोणाला काय वाटतं हा प्रत्येकाचा वेगळा विषय आहे असे महाजन म्हणासे.
अकोल्यामध्ये सिलेंडरच्या रांगेत एकाचा मृत्यू झाला याबाबत मला माहिती नाही असे गिरीश महाजन म्हणाले. मात्र लोकांनी सिलेंडर बाबत पॅनिक होऊ नये सर्वांना सिलेंडर मिळत आहे व पेट्रोल पंप देखील उघडे आहेत असे महाजन म्हणाले. एखाद्या वेळेस अफवा आली की लोक धाव घेतात त्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नये असे महाजन म्हणाले. देशाची परिस्थिती आपला सर्वांना माहिती आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुखी आपला देश आहे असे महाजन म्हणाले. आपल्या देशात अद्याप कुठलीही ताना ताण व भाव वाढ नाही किंवा कुठे शॉर्टेज नाही. त्यामुळे सिलेंडर जमा करून ठेवणे पेट्रोल भरून ठेवणे असं कोणीही करू नये असे आवाहन महाजन यांनी केले.
आणखी वाचा
Comments are closed.