आरोपीला कोर्टात आणल्याची अफवा पसरली अन् जमाव संतप्त, नागरिक थेट न्यायालयात शिरले अन्…; मालेगा
मालेगाव जन आक्रोश मोर्चावर गिरीश महाजन : नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने तिचे डोके ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात जन आक्रोश मोर्चा (Malegaon Jan Akrosh Morcha) काढण्यात आला. मोर्चादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि संतप्त आंदोलकांनी मालेगाव कोर्टाच्या गेटकडे धाव घेत ते गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आता मालेगावमध्ये नेमकं काय घडलं? याबाबत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, मालेगावमध्ये निघालेल्या मूक मोर्चात अफवा पसरल्याने बांधव आक्रमक झाले होते. नागरिकांची मागणी आहे की, आरोपीला चौकात ठार मारा. आरोपीने केलेले कृत्य हे अतिशय खालच्या पातळीचे आहे. त्यामुळे त्याला माफी नाही. मात्र, कायदा तशी परवानगी देत नाही. नियमानुसार या प्रकरणात केस होईल. त्यानंतर या आरोपीला फाशी होईल. याबाबत कोणाच्या मनात शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
Girish Mahajan on Malegaon Jan Akrosh Morcha: उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्याची कुटुंबियांची मागणी
मी रात्री उशिरा त्या गावामध्ये गेलो. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांसह गावातील लोकांना भेटलो. सर्व कुटुंबीयांच्या व ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या. आरोपीला ठेचूनच मारावे, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांकडून या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी करण्यात आली. त्यानुसार तात्काळ मी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवर बोललो. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी देखील मी फोनवर बोललो आहे. त्यांनीही याबाबत मान्यता दिली आहे. मालेगावपासून 30 किलोमीटर लांब असलेल्या या गावामध्ये पोलीस चौकी नसल्याने याबाबत डीआयजींची मी बोललो आणि याबाबत मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आहे. आजपासून त्या गावामध्ये एक पीएसआय व चार पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती देखील गिरीश महाजन यांनी दिली.
Girish Mahajan on Malegaon Jan Akrosh Morcha: आरोपीला कोर्टात आणल्याची अफवा पसरली अन् जमाव संतप्त
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, नराधमांनी केलेले कृत्य हे चीड आणणार आहे. त्यामुळे त्या नराधमाला माफी नाही. गावकरी महिलांनी मला अडवून त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. मात्र, त्या भगिनींची मी समजूत घातली. आज त्या ठिकाणी मोर्चा होता. गैरसमजातून काही जण कोर्टात शिरले. आरोपीला कोर्टात आणलं असं कोणीतरी सांगितलं आणि त्यामुळे संतप्त महिला कोर्टात शिरल्या. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. आता शांतता आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जनतेने शासनावर व मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा. तुमच्या ज्या भावना आहेत, त्या आमच्या देखील भावना आहेत. लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लागेल आणि सात-आठ महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Malegaon News: आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मालेगावात जमाव आक्रमक; न्यायालयाचा दरवाजा तोडला, PHOTO
आणखी वाचा
Comments are closed.