सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होण्याची चर्चा, संजय राऊतांनी वात पेटवली, आता गिरीश महाजनांची महत्त्व
संजय राऊत यांच्यावर गिरीश महाजन अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (दि.12) प्रचाराचा नारळ फोडला. यानिमित्त बारामतीत आयोजित सभेत मंत्री अदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत भावूक भाषण केले होते. आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायची इच्छा आणि स्वप्न होतं. भविष्यात सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनेत्राताई पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर हा भाजपच्या मनाचा मोठेपणा आहे, असे म्हणत खोचक टोला लगावला. आता मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना डिवचलंय.
Girish Mahajan on Sanjay Raut: नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन यांना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा. असे राजकीय वातावरण तापत नाही. संजय राऊत यांनी मागे म्हटले होते की, पंतप्रधानपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत, असे म्हणत गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.
Sanjay Raut on Sunetra Pawar: नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. सुनेत्राताई पवार यांना जर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री करणार असेल तर हा भारतीय जनता पक्षाच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याआधी वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंपेक्षा सुनेत्रा पवार यांची निवड करतात की काय? असं मला त्यांच्या बोलण्यात जाणवत आहे, असे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, शरद पवार यांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाले असाल, अजितदादा असेल, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील, तुम्ही आज राजकारणात पवार म्हणून उभे आहात. ते शरद पवार यांच्यामुळे आहात याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात? आम्ही कोण आहोत? आम्ही सगळे ठाकरे या नावामुळे आहोत. ठाकरे या नावाला वैभव आणि गौरव हा बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करून दिला, तेच नसते तर आम्ही काय असतो? तुमचे आडनाव पवार आहे. तुमच्या पूर्वजांनी तुमच्या आडनावाला जे वलय निर्माण करुन दिले आहे. बारामतीमध्ये शरद पवारच हे लक्षात घ्या, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.