संजय राऊतांचं ट्विट येताच गिरीश महाजनांनी प्रफुल्ल लोढाच्या फोटोंची ‘पवार’फुल्ल कुंडलीच काढली
गिरीश महाजन: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपची चांगलीच चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवला होता. राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅप प्रकरणात अडकले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. आता हे प्रकरण जळगावच्या जामनेरपर्यंत पोहोचले आहे. भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल्ल लोढावर (Praful Lodha) हनी ट्रॅपचा (Honey Trap) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि प्रफुल्ल लोढाचा एक फोटो ट्विट केलाय. मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले, या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या! दूध का दूध पानी का पानी होईल! 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेव्हा ) याच ट्रॅपमुळे पळाले, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. आता यावर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.
गिरीश महाजन म्हणाले की, प्रफुल्ल लोढा हा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. तो अनेक पक्षात होता. शरद पवार, जयंत पाटील, अजित दादा पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबत प्रफुल्ल लोढा यांचे फोटो आहेत, असे म्हणत त्यांनी मोबाईलमध्ये प्रफुल्ल लोढा याच्यासोबत नेत्यांचे असलेले फोटो दाखविले. तर प्रफुल्ल लोढा याच्या सोबत फोटो असलेल्या उद्धव ठाकरे, शरद पवार, अजितदादा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा पण हनी ट्रॅपशी संबंध आहे का? या सर्वांची पण आता सीबीआय आणि एसआयटी चौकशी करायची का? असा सवाल देखील मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय.
खडसेंच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाची आता चौकशी करायची का?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढानं गेल्या वर्षी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करु शकणार नाहीत, यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी केली. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे प्रफुल्ल लोढाच्या एसआयटी चौकशीची मागणी करत आहेत, पण काही वर्षापूर्वी लोढा याने खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशी मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला, त्यावेळी मी खडसे यांच्या सोबत होतो, मग त्या प्रकरणाची आता चौकशी करायची का? अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय
मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो. काही वर्षापूर्वी व्हिडिओ बघितले होते प्रफुल्ल लोढा अत्यंत खालच्या भाषेत एकनाथ खडसे यांना बोलताना दिसत आहे. त्याला काय म्हणावे? कोणत्याही प्रकरणात खडसे माझा संबंध जोडून माझी बदनामी करतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, पण मी खालच्या पातळीवर जाणार नाही. प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली आहे, त्याची चौकशी पोलीस करतील. जे सत्य आहे ते समोर येईलच, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.