गोवा बनावटीची दीड कोटींची लाख रुपयांची दारू पकडली; उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची हातखंब्यात कारवाई
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे पकडला.या कारवाईत १ कोटी ४७ लाख रुपयांचा दारू जप्त करण्यात आली आहे. वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. त्या ट्रकमध्ये १४०० पुठ्याच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. वाहनचालक सचिन सपकाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.ए.पाडाळकर, दुय्यम निरीक्षक पी.ए.गुरव, जवान मानस पवार, अतुल वसावे, अनुराग बर्वे, विशाल विचारे, विशाल भोसले, नीलेश तुपे आणि सागर टीकार यांनी ही कारवाई केली आहे.
Comments are closed.