50 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक एजीएममध्ये होणार
राज्यातील 50 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका विशेष सर्वसाधारण (एजीएम) सभेत घेण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, 2014 मधील नियम 76-जी मध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या ई-वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीसाठी 35 दिवसांचा कार्यक्रम निश्चित केला आहे, मात्र 50 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांची निवडणूक विशेष सर्वसाधारण सभेत घेतल्यास ही प्रक्रिया अवघ्या 9 ते 13 दिवसांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
Comments are closed.