सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, मुंबईसह देशातील विविध शहरातील दर जाणून घ्या
सोन्याची किंमत आज मुंबई :डॉलर मजबूत झाल्यानं आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसंदर्भा चांगले आकडेवारी समोर आल्यानं शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 91140 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 99490 रुपये इतका आहे. चांदीचे दर 100 रुपयांनी कमी होऊन 113900 रुपये किलोवर आली आहे.
जून 2025 मध्ये अमेरिकेत रिटेल विक्रीत 0.6 टक्के वाढ झाली आहे. विक्री वाढण्याचा अंदाज 0.1 टक्के इतका होता. टॅरिफमुळं निर्माण झालेल्या अस्थिरतेनंतर देखील ग्राहकांची मोठी मागणी यातून दिसून येते. याशिवाय अमेरिकेच्या कामगार विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 12 जुलैपर्यंत बेरोजगारीच्या दाव्यांची संख्या 7000 नं घटून 221000 वर आली आहे. यामध्ये 235000 पर्यंत वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 ऑगस्टला संपणाऱ्या सोन्याच्या वायद्याच्या दरात 0.02 टक्के घसरण झाली आणि ते 97470 रुपयांवर आले. तर, 5 सप्टेंबरला संपणाऱ्या चांदीच्या सोन्याच्या वायद्याच्या दरात 0.18 टक्के वाढ होऊन ते 112683 रुपये किलोवर पोहोचले.
भारतातील विविध शहरातील सोन्याचा दर
मुंबईहैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकाता येथे आज 22 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 91,060 रुपये इतका आहे. जेव्हा 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 99,340 रुपये इतके आहेत. पाटणा आणि अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 91,110 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 99,390 रुपये इतका आहे.जयपूर मध्ये22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 91,140 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 99,490 रुपये आहे.
सर्राफा बाजारात सोन्याचा दर 2025 या वर्षात 22088 रुपयांनी वाढले तर चांदीचे दर 26283 रुपयांनी महागले आहेत. 31 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा दर 76045 रुपये प्रतितोळा होता. तर, चांदीचे दर 85860 रुपये प्रति किलो होते. तेव्हापासून जगभरातील आर्थिक घडामोडी, डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आणि शेअर बाजारातील अनिश्चितता यामुळं सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. भारतात विविध सण आणि लग्नसराईच्या काळात सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते.
आणखी वाचा
Comments are closed.