सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा, दरवाढीला ब्रेक लागला, जाणून घ्या नवे दर

सोन्याचे चांदीचे दर नवी दिल्ली: देशात आज सोन्याच्या दरात बदल झाले नाहीत.  सोन्याचे दर काल प्रमाणेच 111170 रुपये 10 ग्रॅम आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ सुरु होती. भारतात सोने खरेदी शुभ मानली जाते. लोक सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानतात त्यामुळं गुंतवणूक करताना सोन्याला प्राधान्य दिलं जातं. सामान्यपणे जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध पेटतं किंवा प्रमुख देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाल्यास  सोन्याच्या दरात वाढ होत असते.

सोन्याचे दर (Gold Rate)

सोन्याचे दर सातत्यानं बदलत असतात. सध्या 24 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 1,11,170  इतके आहेत. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1,0,1900 रुपये इतका आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमचा दर 8337 रुपये आहे. सोन्याच्या दरात आज वाढ झालेली नाही. कालच्या इतकेच सोन्याचे दर आज देखील आहेत. मात्र, देशातील विविध राज्यात आणि शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असू शकतात. कारण वाहतूक खर्च आणि मेकिंग चार्जेस देखील प्रत्येक शहरात वेगवेगळे असू शकतात. याशिवाय सोन्यावर जीएसटी म्हणून 3 टक्के शुल्क आकारलं जातं.

चांदीचे दर काय?

सध्याचा चांदीचा एक किलोचा दर 133000 रुपये इतका आहे. म्हणजेच चांदीचा दर कालच्या इतकाच आहे. भारतात चांदीचे दर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य याशिवाय आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून असते.

देशातील प्रमुख शहरांमधील 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर

दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1,11,300  रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 102050 रुपये आहे. तर,18 कॅरेट सोन्याचा दर 83520 रुपये इतका आहे.

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 1,11,170  रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 101900 रुपये आहे. तर,18 कॅरेट सोन्याचा दर 83370 रुपये इतका आहे.

चेन्नईत आज 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 111710  रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 102200 रुपये आहे. तर,18 कॅरेट सोन्याचा दर 84600 रुपये इतका आहे.

बंगळुरुत आज 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 111170  रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 101900 रुपये आहे. तर,18 कॅरेट सोन्याचा दर 83370 रुपये इतका आहे. हे दर जीएसटीशिवायचे असून जीएसटीचा समावेश केल्यानंतर सोन्याचे दर अधिक असतील. याशिवाय मेकिंग चार्जेस देखील आकारले जातात.

दरम्यान, यंदा सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.