आठवड्यात सोनं 3770 रुपयांनी महागलं, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या नवे दर
Gold and Silver Price Today नवी दिल्ली : सोन्याच्या दरात या आठवड्यात देखील तेजी पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात सोन्याचे दर वाढल्यानं गुंतवणूकदारांना फायदा झाला. काल बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादमध्ये सोन्याचे दर घसरले. यामुळं सोने खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. 14 डिसेंबरला राजधानी नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 134070 इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 122900 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 10058 रुपये इतका आहे.
चेन्नई आणि मुंबईतील सोन्याचे दर काय ?
रविवारी चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर बदलला नाही. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा दर 123700 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 134950 रुपये इतका आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 103300 रुपये इतका आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 133910 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 122750 रुपये आहे.
बंगळुरु आणि हैदराबादमधील सोन्याचा दर
बंगळुरुतील 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 133910 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 122750 रुपये आहे. हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 133910 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 122750 रुपये आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर किती?
आंतरराष्ट्रीय बाजारातील हाजिर सोन्याचा दर 4338.40 डॉलर प्रति औंस इतका आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे शुक्रवारचे दर 133622 रुपये होते. 5 मार्च 2026 च्या एक्सपायरीच्या चांदीचा दर 192615 रुपये आहे.
स्पॉट गोल्ड आणि चांदीची किंमत
Goldprice.org च्या आकडेवारीनुसार हाजिर सोन्याचा शुक्रवारी दर 0.40 टक्क्यांनी वाढून 4,300.4 डॉलर प्रति औंस वर बंद झाला. तर, हाजिर चांदीच्या दरात देखील घसरण झाली. चांदीचा दर 3.55 टक्क्यांनी घसरुन 61.96 डॉलर प्रति औंसवर आला. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान 24 कॅरेट सोन्याचा दर 3770 रुपयांनी वाढला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 3450 रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान, 2025 हे वर्ष सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरलं आहे. 2025 मध्ये सोन्याचे दर 55 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढले आहेत. तर, चांदीच्या दरात एक लाख रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.