होळीपूर्वीच सोन्याला झळाळी! दरात झाली मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे?
सोन्याची किंमत: भारतात दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजही दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज MCX वर सोन्याचे दर हे 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकातामध्ये 86,880 रुपये, मुंबई 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चेन्नईमध्ये 87,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
मिळालेल्या माहितीनुसार, आज नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 79,741 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वाराणसीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,768 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. लखनौमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,768 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,732 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 78,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,741 रुपये आणि 86,990 रुपये आहे.
काय आहे चांदीच्या दराची स्थिती?
चांदीच्या वायदा किमतींची सुरुवातही तेजीची होती. आज 13 मार्च 2025 रोजी चांदीचा दर 992.9 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्लीत प्रति 10 ग्रॅम चांदीची किंमत 991.2 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 995.8 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकातामध्ये 991.6 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाटण्यात ते 992.4 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, लखनऊमध्ये ते 993.2 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि जयपूरमध्ये ते 992.8 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
सोन्याच्या दरात अनेक कारणांमुळे चढ-उतार
सोन्याच्या दरात अनेक कारणांमुळे चढ-उतार होत आहे. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही. किंबहुना आपल्या परंपरा आणि सणांचाही तो महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सण आणि लग्नसमारंभात सोन्याची मागणी वाढते असे दिसून आले आहे. यासोबतच जागतिक बाजारात सोन्याची किंमत, सरकारी कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढउतार यांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. दरम्यान, वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करणं परवडत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झल लागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे?
अधिक पाहा..
Comments are closed.