धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने सर्व विक्रम मोडले, किमतीत मोठी वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?


आज सोन्याचा भाव: शुक्रवारी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 डिसेंबरची मुदत संपलेल्या सोन्याच्या वायदा 1,31,026 रुपयांवर (प्रति 10 ग्रॅम) उघडल्या. गुरुवारी, MCX वर सोने 1,29,852 रुपयांवर बंद झाले होते.

17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता, MCX वर 5 डिसेंबरची मुदत संपलेल्या सोन्याचा भाव 1,31,840 रुपयांवर होता, जो मागील दिवसाच्या किमतीपेक्षा अंदाजे 1900 रुपयांनी वाढला. सुरुवातीच्या व्यवहारात MCX सोने 1,32,294 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर – प्रति 10 ग्रॅम

Gold Price in Delhi: दिल्लीमध्ये सोन्याचे दर

24 कॅरेट: 1,32,920 रुपये

22 कॅरेट: 1,21,850 रुपये

18 कॅरेट: 97,220 रुपये

मुंबईत सोन्याचा भाव मुंबईमध्ये सोन्याचे दर

24 कॅरेट: 1,32,770 रुपये

22 कॅरेट: 1,21,700 रुपये

18 कॅरेट: 99,580 रुपये

Gold Price in Chennai: चेन्नईमध्ये सोन्याचे दर

24 कॅरेट: 1,33,090 रुपये

22 कॅरेट: 1,22,000 रुपये

18 कॅरेट: 1,01,000 रुपये

Gold Price in Kolkata: कोलकातामध्ये सोन्याचे दर

24 कॅरेट: 1,32,770 रुपये

22 कॅरेट: 1,21,700 रुपये

18 कॅरेट: 99,580 रुपये

Gold Price in Ahmedabad: अहमदाबादमध्ये सोन्याचे दर

24 कॅरेट: 1,32,820 रुपये

22 कॅरेट: 1,21,750 रुपये

18 कॅरेट: 99,630 रुपये

Gold Price in Lucknow: मध्ये सोन्याचे दर

24 कॅरेट: 1,32,920 रुपये

22 कॅरेट: 1,21,850 रुपये

18 कॅरेट: 99,730 रुपये

Gold Price : नागरिकांची चिंता वाढली

सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. धनत्रयोदशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा वेळी सोन्याच्या वाढत्या किंमतींनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. भारतीय संस्कृतीत धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. मात्र, यंदा दर जास्त असल्याने सोने खरेदीची कमी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतात सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व आहे आणि ते शतकानुशतके भारतीयांशी जोडले गेले आहे. म्हणूनच भारतातील लोक सोने खरेदी करणे शुभ मानतात. गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून देखील पाहतात. गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की सोने नेहमीच चांगले परतावे देते. म्हणूनच सोन्याला मौल्यवान धातू असेही म्हटले जाते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं…

Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर

आणखी वाचा

Comments are closed.