टॅरिफमुळं गुंतवणूकदारांनी रणनीती बदलली, सोने दरात जोरदार तेजी, जाणून घ्या नवे दर

आज सोन्याची किंमत: रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवल्यानं अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावलं आहे. अमेरिकेनं भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. यामुळं भारतीय शेअर बाजारात गसरण पाहायला मिळाली. निर्यातदारांमध्ये देखील अनिश्चिततेचं वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जोपर्यंत टॅरिफचा वाद संपत नाही तोपर्यंत भारतासोबत चर्चा करणार नाही, असं म्हटलंय.

जागतिक अस्थिरता आणि आर्थिक दबावामुळं गुंतवणूकदारांकडून सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं आहे. यामुळं सोने दरातील तेजी वाढत आहे. शुक्रवार (8 ऑगस्ट 2025) म्हणजे  आज 24 कॅरेट सोन्याचे दर 102000 रुपये एक तोळा होते.

तुमच्या शहरातील सोन्याचा दर

राष्ट्रीय भांडवल नवी दिल्ली 24 कॅरेट सोन्याचा दर 102710 रुपये एक तोळा, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 94160 रुपयांना विकलं जात आहे. अहमदाबाद आणि पाटणा येथे 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 102710 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 94060 रुपये इतके आहेत.

मुंबईहैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकाता या प्रमुख  महानगरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 102560 रुपये एक तोळा इतका दर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 94010 एक तोळा इतका आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषय समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. रेपो रेट 5.5 टक्के कायम आहे.

सोन्याचे दर कसे ठरतात?

सोने आणि चांदीचे दर जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या आधारे ठरतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अमेरिकेनं डॉलरमध्ये ठरतात. डॉलर-रुपया विनिमय दरात तेजी आणि घसरण यावर भारतातील सोन्याचे दर ठरतात. जर डॉलर महागला आणि रुपया कमजोर झाला तर भारतात सोने आणि चांदीचे दर कमी होतात.  भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. सीमा शुल्क, वस्तू आणि सेवा कर यासह इतर स्थानिक करांचा समावेश आहे.

जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरता, युद्ध, मंदी आणि व्याज दरातील बदल या परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सोन्याची मागणी वाढल्यास किंमत वाढते. भारतात सोन्याचं सांस्कृतिक महत्त्व आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते. महागाईच्या काळात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय मानला जातो.

सोने दरात 2025 मध्ये 25666  रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 28766 रुपयांची वाढ झली आहे. 31 डिसेंबरला सोन्याचे दर 75740 रुपये होते तर चांदीचे दर 86017 रुपये प्रति किलो इतके होते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.