रॉकेटच्या वेगानं सोने दरवाढ, सात दिवसात सोनं 1300 रुपयांनी महागलं, 10 ग्रॅम किती रुपयांना?
मुंबई : भारतीय शेअर बाजारात सुरु असलेली घसरण थांबण्याचं चित्र नसल्याचं पाहायला मिळतंय. यामुळं शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य गुंतवणूकदारांकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळतं. गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याचे दर 1300 रुपयांनी महागले आहेत. सोन्याच्या दरातील तेजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आणि घरगुती बाजारात देखील वाढ झाली आहे.
मुंबईत 23 जानेवारी 2025 ला 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 80477 रुपये होते. तर, चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 80616 रुपये इतके होते. कोलकाता येथे 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 80745 रुपये तर नोएडामध्ये 80646 रुपये इतके होते.
सोन्याच्या दरात मोठी वाढ
सोन्याच्या दरात अर्थसंकल्पानंतर मोठी वाढ सुरु आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 4 एप्रिलच्या वायद्यानुसार 10 ग्रॅम सोन्याचे दर 84687 रुपयांपर्यंत पोहोचली होती. 21 फेब्रुवारी पर्यंत कारभार बंद होईपर्यंत ते 86020 रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळाला. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 17 फेब्रुवारीला 10 ग्रॅम सोन्याचा दर 85254 रुपये होता. 18 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोन्याचा दर 85690 रुपये, 19 फेब्रुवारीला 86733, 20 फेब्रुवारीला 86520 रुपयांपर्यंत सोन्याचे दर पोहोचले होते.
सोन्याच्या दरात वाढ का सुरु?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जगभरात महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. यामुळं गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याची निवड केली जातेय. दुसरीकडे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं नुकसान होण्याची भीती असल्यानं हा निर्णय घेतला जातोय. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून जोरदार विक्री सुरु असल्यानं बाजारावर परिणाम होतोय. यावेळी सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक असल्यानं गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरु आहे.
सोन्याच्या दरात वाढ सुरु असली तरी गुंतवणूकदारांनी सुरक्षित राहणं आवश्यक आहे. यावर्षी सोन्याचे दर 11 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, जानेवारी 2024 पासून सोन्याचे दर 38 टक्के वाढले. अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरु असलेलं व्यापार युद्ध, जागतिक स्तरावर वाढलेला तणाव, केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी, या कारणांमुळं सोने दर वाढत आहेत. गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीचा पर्याय देखील गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरु शकते.
इतर बातम्या :
सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 हजार 152 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा अराल अर्ज?
अधिक पाहा..
Comments are closed.