चांदीचे दर 20 हजार रुपयांची वाढले, सोनं 4000 रुपयांनी महागलं, 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर

मुंबई : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 27 जानेवारीला सुरुवातीला सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. भू राजनैतिक संघर्ष वाढल्यानं भांडवली बाजारातील जोखीम वाढल्यानं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यानं आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीची शक्यता असल्यानं सोने दरात वाढ झाली आहे.

Gold Silver Rate : सोने- चांदीचे दर उच्चांकावर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीच्या वायद्याचे सोन्याचे दर 4000 रुपयांनी वाढून 159820 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मार्चच्या वायद्याचे चांदीचे दर 20000 रुपयांनी वाढून  354780 रुपये किलोच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोने मजबूत झालं आहे. सलग सातव्या दिवशी सोनं 5000 डॉलर प्रति औंसच्यावर ट्रेड होत आहे. डॉलर कमजोर झाल्यानं, भू राजनैतिक तणाव आणि सरकारी बाँडपासून गुंतवणूकदार दूर गेल्यानं सोने दरवाढीला बळ मिळालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  दक्षिण कोरियाच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवण्याची धमकी दिल्यानं त्याचा परिणाम देखील बाजारावर झाला.

गेल्या दोन वर्षात सोनं मोठ्या प्रमाणावर महागलं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 सोन्याचे दर 64 टक्क्यांनी वाढले होते. तर, जानेवारी महिन्यात सोनं 17 टक्क्यांनी वाढले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ग्रीनलँडवर करण्यात आलेला दावा, व्हेनेझुएलातील सैन्य कारवाई आणि फेड रिझर्व्हच्या स्वायतत्तेवर केले जाणारे हल्ले यामुळं बाजारावर परिणाम झाला आहे. गुंतवणूकदार सोने दर कमी झाल्यास खरेदी करत असून तेजीची अपेक्षा करत आहेत.

मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील सोने दर (गुड रिटर्न अनुसार)

दिल्लीतील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,62,100 रुपये
22 कॅरेट – 1,48,600 रुपये
18 कॅरेट – 1,21,610 रुपये

मुंबईतील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,950 रुपये
22 कॅरेट – 1,48,450 रुपये
18 कॅरेट – 1,21,460 रुपये

चेन्नईतील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,63,200 रुपये
22 कॅरेट – 1,49,600 रुपये
18 कॅरेट – 1,24,750 रुपये

कोलकाता मधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,950 रुपये
22 कॅरेट – 1,48,450 रुपय
18 कॅरेट – 1,21,460 रुपये

अहमदाबादमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,62,000 रुपये
22 कॅरेट – 1,48,500 रुपये
18 कॅरेट – 1,21,510 रुपये

लखनऊमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,62,100 रुपये
22 कॅरेट – 1,48,600 रुपये
18 कॅरेट – 1,21,610 रुपये

पाटणा येथील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,62,000 रुपये
22 कॅरेट – 1,48,500 रुपये
18 कॅरेट – 1,21,510 रुपये

हैदराबादमधील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,950 रुपये
22 कॅरेट – 1,48,450 रुपये
18 कॅरेट – 1,21,460 रुपये

दरम्यान, आयबीजेएकडून दिवसातून दोनवेळा दर जाहीर केले जातात. दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता आयबीजेएकडून दर जाहीर केले जातात.

हेदेखील वाचा

Comments are closed.