सोनं महागलं की स्वस्त झालं? मुंबई, नवी दिल्लीसह प्रमुख शहरांतील सोने-चांदींचे दर जाणून घ्या
आज सोन्याची किंमतमुंबई : तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याबाबत विचार करत असाल महत्त्वाची अफडेट आहे. सोने आणि चांदी खरेदीचं नियोजन करण्यापूर्वी बाजारभावासंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. 21 जुलै रोजी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं. मात्र, 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाखांच्यावर कायम आहेत. आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर 548 रुपयांनी वाढून 103754 रुपयांवर आले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 91690 रुपये, 18 कॅरेट सोन्याचे एका तोळ्याचे दर 75020 रुपयांवर आहेत. चांदीचे एक किलोचे दर 116142 रुपयांवर आहेत.
देशातील विविध शहरांमधील सोन्याचा दर
भांडवल नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,180 रुपये प्रति तोळा इतका आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याच दर 91,840 रुपयांवर आहे. कोलकाता, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,030 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा कोलकाता, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमधील एका तोळ्याचा दर 91,690 रुपयांवर आहे.
याच प्रकारे जयपूर, अहमदाबाद आणि पाटणा येथे 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 100180 रुपये इतका आहे. त्याचवेळी 22 कॅरेट सोन्याचा अहमदाबादमधील दर 91,840 रुपये, पाटणा येथे 91,740 रुपये प्रति तोळा इतका आहे.
भारत अमेरिका व्यापार कराराकडे लक्ष
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून विविध देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी अमेरिका विविध देशांसोबत व्यापारी करार करत आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवार्ड लुटनिक यांनी म्हटलं की ते यूरोपियन यूनियन सोबतच्या व्यापारी कराराबाबत सकारात्मक आहेत.
सोने चांदीचे दर कसे ठरतात?
सोने- चांदीचे दर दररोज ठरवले जातात. सोन्याचे आणि चांदीचे दर निश्चित करताना विनिमय दर, डॉलरच्या दरातील तेजी आणि घसरण आणि सीमा शुल्क या गोष्टींचा विचार करुन ठरवले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील छोट्या मोठ्या घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होतो. जागतिक बाजारात अनिश्चितता वाढल्यास इन्वेस्टर्स मार्केटपासून दूर जातात आणि सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात.
सोन्याला भारतात सामाजिक आणि आर्थिक महत्त्व आहे. लग्न आणि सणासुदीच्या काळात सोनं खरेदी केली जाते. याशिवाय कुटुंबाकडे सोनं असणं त्या कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं. सोन्यातून दर वेळी महागाईच्या तुलनेत चांगला परतावा मिळालेला आहे. त्यामुळं सोन्याची मागणी कायम असते. दरम्यान, या वर्षी सोन्याचे दर 23051 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीचे दर 26743 रुपयांनी वाढले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.