सोन्याच्या दरानं 99 हजारांचा टप्पा ओलांडला, चांदी 1 लाख 6 हजारांच्या पार, MCX वर काय घडलं?
आज सोन्याची किंमत मुंबई: इराण आणि इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात काय बदल होतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या आठवड्याच्या सुरुवातीला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सुरुवातीला सोन्याच्या दरात फार तेजी नव्हती मात्र नंतर सोने दरानं वेग पकडला. सोन्याचे दर 99200 रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर, चांदीचे दर 1 लाख 6 हजार 600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्यांच्या दरात नरमाई पाहायला मिळाली. तर, चादींच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या ऑगस्टच्या वायद्याच्या दरात 9 रुपयांची घसरण होऊन ते 99100 रुपयांवर सुरु झाले. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली. नव्या अपडेटनुसार 10 ग्रॅम सोन्याचे दर 99185 ते 99200 रुपयांपर्यंत पोहोचले होते. आज सोन्याच्या दरानं 99243 चा उच्चांक गाठला होता तर निचांक 99096 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यंदाचा सोन्याच्या वायद्याचा उच्चांक 1 लाख 1 हजार 78 रुपये इतका होता.
चांदीच्या दरात वाढ
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात सुरुवातीपासून तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जुलैच्या वायद्याच्या दरात 271 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. चांदीच्या दराचे वायदे 106495 रुपयांवर सुरु झाले. त्यानंतर यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या वायद्यांमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली अन् ते 406 रुपयांच्या वाढीसह 106630 रुपयांपर्यंत वायदे पोहोचले. यंदा चांदीच्या वायद्याच्या दरांचा उच्चांक 109748 इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर घसरले, चांदीचे दर वाढले
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायद्याच्या दरात फार वाढ झाल्याचं दिसून आलं नाही. कॉमेक्सवर सोन्याचे व्यवहार 3400.70 डॉलर प्रति औंसवर सुरु झाले. यापूर्वीचं क्लोजिंग 3385.70 डॉलर प्रति औंस इतकं होतं. सुरुवातीच्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर घसरुन 3378.80 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचले होते. यंदा कॉमेक्सवरील सोन्याच्या दराचा उच्चांक 3509.90 डॉलर प्रति औंस इतका आहे. कॉमेक्सवर चांदीचा दर 36 डॉलरच्या दरावर सुरु झाले. त्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
सर्राफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 193 रुपयांनी घसरुन 98884 रुपयांवर होते.चांदीच्या दरात वाढ झाली. जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचे दर 101850 रुपये इतके आहेत. तर, आयबीजेएच्या दरांनुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 192 रुपयांनी महागले आहेत. 23 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 98488 रुपये असून हे जीएसटी आणि इतर शुल्कांशिवाय आहेत. यंदा सोन्याच्या दरात मोठी तेजी आली असून सोन्याचे दर 23144 रुपयांनी महागले आहेत. तर, चांदीचे दर 20783 रुपयांनी महागले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.