युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती?
पुणे : अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला आहे. सोन्याचे दर युद्धामुळं वाढत असल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातील KRA ज्वेलर्सचे भागीदार अतुल अष्टेकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना सोन्याच्या दरांवर भाष्य केलं.27 -28 तारखेपर्यंत सोन्याचे दर 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत होते. शनिवारी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंत सोन्याचे दर 1 लाख 69 हजारांवर पोहोचले होते. काल सोन्याचे दर कमी झाले होते, आज सोन्याचे दर 1 लाख 63 हजारांवर आहेत, असं अष्टेकर यांनी सांगितलं.
अतुल अष्टेकर म्हणाले की, जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यानं सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. हे युद्ध किती दिवस चालतं यावर सोन्याचे दर अवलंबून आहेत. युद्ध आठ दहा दिवसात संपलं तर परिस्थिती नॉर्मल होईल. बरेच तज्ज्ञ म्हणतात युद्ध तीन चार आठवडे लांबलं तर परिणाम तेलावर होईल. तेलाचा पुरवठा कमी झाला तर भविष्यात त्याचा महागाईवर परिणाम होतो. जेव्हा महागाईवर परिणाम होतो, त्यावेळी सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. महागाई वाढली तर सोन्याचे दर वाढतील, असंही त्यांनी म्हटलं.
युद्ध लांबलं तर सोन्याचे दर 2 लाखांवर
अमेरिकन डॉलर भक्कम होत आहे, त्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढले नसते आणि डॉलर जर वाढला आणि रुपया कमजोर झाल्यानं भारतात येणाऱ्या सोन्याचा खर्च वाढतो. युद्ध पुढील आठ दहा दिवसात थांबलं तर सोन्याच्या दरात एक, दोन, तीन टक्के, पाच टक्के युद्धाचे दर पाहत होतो तेवढे म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपये होऊ शकतो. तर, युद्ध लांबलं तर सांगता येणार नाही पण सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत जाऊ शकतात, असं अतुल अष्टेकर म्हणाले.
सोन्याचे दर वाढल्यानं ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होतो. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत सोन्याचे दर 80 ते 90 हजार रुपयांदरम्यान दर होते. सध्या सोन्याचा दर 1 लाख 60 हजारांच्यावर आहे. भारतीय ग्राहक आहेत त्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर लग्नामध्ये सोनं खरेदी केले जाते. या वर्षी लग्नाच्या तारखा खूप आहेत. 15 मे पर्यंत लग्नाच्या तारखा खूप आहेत. जूनपासून डिसेंबर पर्यंत लग्नाच्या तारखा आहेत. लग्नाची खरेदी ग्राहकांना करावीच लागेल. यात आव्हान आहे की ग्राहकांच्या बजेटमध्ये दागिने बसणे हे आव्हान असेल. ग्राहकांच्या सोने खरेदीचा कल कमी होणार नाही. दिवाळीत सोन्याचे दर वाढले तरी ग्राहकांनी खरेदी थांबवलेली नाही, असंही अष्टेकर यांनी म्हटलं.
सोन्यात गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती?
सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहता तेव्हा ती शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसारखी नाही, आज घेतलं आणि उद्या विकलं असं नाही. आजपासून 10 वर्षानंतर विचार केला तर तेव्हाचे जे दर असतील तेव्हा विकायला गेला तरी फायदा होईल. शॉर्ट टर्मचा विचार न करता लाँग टर्मचा विचार करावा. सोन्यात गुंतवणूक करायची असेल टप्प्या टप्प्यानं करावी, असंही अष्टेकर म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.