चांदी 2100 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 1300 रुपयांची घसरण, मुंबईतील सोन्याचा दर जाणून घ्या

Gold Rate नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी  तेजी आणि घसरण पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 15 टक्के टॅरिफ लादल्यानं जागतिक तणाव वाढला आहे. यामुळं एकीकडे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळतेय. जागतिक घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर देखील पाहायला मिळाले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर, सोने आज 1300 रुपयांनी स्वस्त झालं तर चांदीचे दर 2100 रुपयांनी कमी झाले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 मार्चच्या चांदीच्या वायद्याचे दर 263183 रुपयांवर आले आहेत. चांदीचे दर उच्चांकाच्या तुलनेत 1.56 लाख रुपयांनी स्वस्त आहेत.

सोने आणि चांदीच्या दरात जागतिक तणाव वाढल्यानं तेजी वाढली होती. मात्र, आज एमसीएक्सवर 2 एप्रिलच्या वायद्याचे सोन्याचे दर 1303 रुपयांनी कमी झाले. काल सोन्याचा दर 161598 रुपये होता. त्यात घसरण होऊन सोन्याचा दर 160295 रुपयांवर आला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरानं 29 जानेवारीला 193096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सोन्याचे दर 32801 रुपयांनी कमी झाले आहेत.

एमसीएक्सवर चांदीच्य दरांचा विचार केला असता 5 मार्चच्या वायद्याचे चांदीचे दर 263183 रुपये किलो झाले आहेत. कालच्या तुलनेत चांदीचे दर 2150 रुपयांनी कमी झाले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या दरानं  29 जानेवारीला  420048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत चांदी  156865 रुपयांनी स्वस्त आहे.

2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाल्यानं 2025 हे वर्ष सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरले होते.

मुंबई, नवी दिल्लीसह प्रमुख शहरातील सोन्याचा दर (गुड रिटर्ननुसार)

दिल्लीतील सोन्याचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,510 रुपये
22 कॅरेट – 1,48,060 रुपये
18 कॅरेट – 1,21,170 रुपये

मुंबईतील सोन्याचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,780 रुपये
22 कॅरेट – 1,48,300 रुपये
18 कॅरेट – 1,21,340 रुपये

चेन्नईतील सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,62,440 रुपये
22 कॅरेट – 1,48,900 रुपये
18 कॅरेट – 1,27,300 रुपये

कोलकातामधील सोन्याचा दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,780 रुपये
22 कॅरेट – 1,48,300 रुपये
18 कॅरेट – 1,21,340 रुपये

अहमदाबादमधील सोने दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,830 रुपये
22 कॅरेट – 1,48,350 रुपये
18 कॅरेट – 1,21,390 रुपये

लखनऊमधील सोने दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,930 रुपये
22 कॅरेट – 1,48,450 रुपये
18 कॅरेट – 1,21,490 रुपये

पाटणा येथील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,830 रुपये
22 कॅरेट – 1,48,350 रुपये
18 कॅरेट – 1,21,390 रुपये

हैदराबादमधील सोने दर  (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट – 1,61,780 रुपये
22 कॅरेट – 1,48,300 रुपये
18 कॅरेट – 1,21,340 रुपये

हेदेखील वाचा

Comments are closed.